निसर्गाने मनुष्याला अन्नाच्या रूपात जीवनासाठी आवश्यक असलेली सर्वात मोठी भेट दिली आहे, परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनात या गरजेकडे दुर्लक्ष केले जाते. अन्न शिजवण्यासाठी आणि खाण्यासाठी वास्तूमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
भोजन करण्यापूर्वी अन्नदेवता आणि अन्नपूर्णा मातेचे नेहमी आभार माना. लक्षात ठेवा की कधीही अन्नाचा तिरस्कार करू नये.
पूर्वेकडील दिशेने खाणे शुभ मानले जाते. असे केल्याने आरोग्य फायदे तर होतात शिवाय देवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो.
असे मानले जाते की पूर्वेकडील दिशेने भोजन केल्याने वय वाढते. खाण्यापूर्वी हात, पाय आणि तोंड नेहमी धुवा. यानंतरच अन्न घ्या. जमिनीवर बसूनच अन्न घ्या. अंथरुणावर बसून अन्न खाऊ नका. असे केल्याने घरात अशांतीचे वातावरण निर्माण होतात.
भोजन तयार करताना आपले मन शांत ठेवा आणि कुटुंबाच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करा. निरोगी आयुष्य जगण्यासाठी, पांढर्या पदार्थांचे सेवन कमीत कमी करा.
अन्नामध्ये वापरलेले मीठ घरात नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास देखील उपयुक्त आहे. जर घरात नकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर एका काचेच्या भांड्यात मीठ घाला आणि घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. त्याशिवाय खडे मीठ लाल कपड्यात बांधून ते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवून ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश होत नाही. जर आपण मुलांच्या अंघोळीच पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकले तर मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.