Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तुशास्त्रात सूर्याचे महत्व

वास्तुशास्त्रात सूर्याचे महत्व
Webdunia
वास्तुशास्त्रात सूर्याचे महत् व
संपूर्ण पृथ्वीशी वास्तुशास्त्र निगडीत आहे. त्यामुळे वास्तुशास्त्राला गृहनिर्माण किंवा गृहव्यवस्थापन या विभागपुरतेच मर्यादित करणे म्हणजे त्याचे महत्त्व कमी करण्यासारखे आहे. भारतीय वास्तुशास्त्र हे फार मोठे व्यापक शास्त्र आहे. वास्तुशास्त्रात घराच्या (वास्तुचे) स्थानाचे नियोजन सर्व पृथ्वी (दिशा) आणि सूर्यमंडळ (सुर्यासहित नवग्रह) यांच्या मदतीनेच करता येते. ज्या पृथ्वीवर आपण रहातो ती या सुर्यमालेचा एक छोटासा घटक आहे आणि ती सुर्याच्या भ्रमणकक्षेतच मार्गक्रमण करते. (परिवलन व परिभ्रमण). सुर्यमालेतील वेगवेगळ्या ग्रहांचा परस्परांवर फार मोठा प्रभाव पडतो. 

या विशाल पृथ्वीची कल्पना सूर्यचंद्राविना करणे अशक्य आहे कारण सूर्य हा तिचा उर्जास्त्रोत आहे त्यामुळे त्याच्याशिवाय तिला उष्णता, ऊर्जा मिळणे अशक्य आहे. त्यामुळेच तर सूर्याविना तिचे अस्तित्व अंध:कारमय तर होईलच पण तिच्यावर मनुष्‍य व इतर प्राण्यांचा वावरही होणे अशक्य होईल.त्यामुळेच तर सूर्य व सूर्यमालेतील इतर ग्रह आणि त्यांचा पृथ्वीवर होणारा ‍परिणाम व त्या परिणामातून निर्माण होणार्‍या रेडिएशनचा (उत्सर्जित लहरी), वातावरणाचा अभ्यासही आवश्यक आहे.

वास्तुशास्त्रात सूर् य
सूर्य हा ह्या पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांचा जीवनस्त्रोत आहे. त्याची उपयुक्तता मानव जातीला सर्वश्रुत आहेच. सुर्यामुळेच आपल्याला ऊर्जा, प्रकाश मिळतो त्याच्या उष्णतेमुळेच ढग तयार होतात, पाऊस पडतो त्यामुळे वनस्पती उत्पन्न होतात, शेती अन्नधान्य निर्माण होते व त्याचाच उपयोग आपल्याला अन्न म्हणून होतो. पृथ्वीवरच्या होणार्‍या सर्व घटना, हालचाली (भू-गर्भीय), भू-पातळीय बदल) याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सूर्य जबाबदार आहे. जसे महाप्रलय, वादळ, पर्वतांचे विखंडन, दिवस-रात्र, ऋतुचक्र या सारख्या अनेक घटना सूर्यामळे घडतात.

माणसाचे जडण-घडण, त्याची राहणी, पोशाख, संस्कृती, शारीरिक क्षमता, मानसिक जडणघडण, खाण्‍या-पिण्याच्या सवयी रिती-रिवाज या सर्व गोष्टींवरही सूर्य ऊर्जेचा परिणाम होतो. पाणी -वारा-पाऊस या मध्ये असणार्‍या भिन्नतेमुळे जगातील वेगवेगळ्या निवार्‍याच्या ठिकाणांवर, कार्यपद्धतीवर सूर्याचा अप्रत्यक्ष परिणाम आहेच. जर सूर्य नष्ट झाला तर पृथ्वीवरील सर्व प्राणीजीवन तीन दिवसात नष्ट होईल. त्यामुळेच तर पूर्वीच्या काळी लोक सुर्याची उपासना करत असत. आर्यांचा दिवस तर सूर्योपासनोपासुनच सुरू होत असे. इजिप्तमध्येही सूर्योपासनेला फार महत्त्व होते.

सूर्य आपल्या सूर्यमालेचा सर्वाच मोठा तारा आहे. त्याचा व्यास 14 लाख किलोमीटर म्हणजे 8,66,300 मैल आहे. त्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाचा 109 पट आहे. सूर्याचे पृथ्वीपासूनचे अक्षांश अंतर 15 कोटी किलोमीटर म्हणजे 9 कोटी 30 लाख मैल आहे. पृथ्वी सुर्याभोवती लंब वर्तुळाकार आकारात प्रदक्षिणा घालते. त्यामुळे तिचे सूर्यापासूनचे अंतर कधी 14 कोटी 75 लाख किलोमीटर होते तर कधी 15 कोटी 25 लाख किलोमीटर सूर्याच्या प्रकाशास पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8.5 मिनिटे लागतात. आकाराने पृथ्वीपेक्षाही मोठा असल्यामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे. तसेच त्याचे तापमान 6000 डिग्री सेल्सियस आहे.

PRRuturaj
सूर् य आपल्यासाठ ी उष्णत ा, ऊर्ज ा व प्रकाशाच ा मुख्‍ य स्त्रो त आह े. पृथ्वीवरी ल एकू ण उष्णतेपैक ी 99.5% उष्णत ा ह ी सूर्यापासू न मिळत े. सूर्याच्य ा दो न किरणांपासू न 1 HP ( हॉर् स- पॉव र) इतक ी ऊर्ज ा मिळत े. सूर् य आगीच ा ए क गोळा च आह े. जास् त तापमानामुळ े सूर्यावरी ल सर् व पदार् थ वायुरूपा त आढळता त. सूर्याच ा बाहेरच ा भा ग पिवळ ा रंगाच ा असू न गर म आह े त्याला च Photosphere म्हणता त. सूर्यापासू न मिळणार ी उष्णत ा ह ी सर् व प्रका श व ऊर्ज ा या च रूपा त असत े. इत र ग्र ह दग ड तसे च घ न पदार्थांपासू न बनलेल े आहे त. सुर्याच्य ा गुरुत्वाकर्ष ण शक्तीमुळ े सर् व ग्र ह सूर्याच्य ा कक्षेत च भ्रम ण करता त.

वास्तुशास्त्रा त अस े काह ी निय म आहे त, क ी त े पाळल्या स पृथ्‍वीव र राहणार े प्राण ी सुर्याच ी उष्णत ा, ऊर्ज ा तसे च अतिनी ल किर ण, तसे च त्यापासू न निघणार े सा त रं ग- जांभळ ा, निळ ा, आकाश ी, हिरव ा, पिवळ ा, नारंग ी व तांबड ा- यांच ा जास्तीतजास् त फायद ा मिळव ू शकता त. सूर् य ज्य ा दिशेल ा उगवत ो त ी पूर् व दिश ा म्हणून च जास् त महत्वाच ी आह े. सूर्याच ी सकाळ ी येणार ी किरण े कोवळ ी असता त त्या त प्रका श जास् त असू न उष्णताह ी कम ी असत े त्यामुळ े आपल्य ा आरोग्याच्य ा दृष्टीन े किरण े जास् त फायदेशी र ठरता त त्याचप्रमाण े सुर् य जेंव्ह ा मावळतील ा पोहोतच ो त्यावेळ ी त्यापासू न निघणार ी अतिनी ल किरण े आरोग्याच्य ा दृष्टीन े हानीकार क ठरता त.

अनुवाद: सौ. भाग्यश्री कुलकर्णी

वास्तू हव्या छंदात

संबंधित माहिती

शंकराची आरती - कर्पूरगौरा गौरीशंकरा

Gharapuri Island: घारापुरी बेट प्राचीन बारा ज्योर्तिलिंग

आरती सोमवारची

महादेव आरती संग्रह

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख
Show comments