rashifal-2026

Aloo Uttapam Recipe: नाश्त्यात मुलांसाठी चविष्ट आलू उत्तपम बनवा, साहित्य आणि कृती जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (23:25 IST)
Aloo Uttapam Recipe: जर तुम्हाला न्याहारीमध्ये आरोग्यदायी आणि चविष्ट असे काहीतरी बनवायचे असेल, जे मुले त्यांच्या शाळेच्या जेवणाच्या डब्यात आनंदाने नेतील, तर आलू उत्तपम करून पहा.अनेकदा मुलं भाजी खायला नाक-तोंड करतात, पण या रेसिपीमध्ये त्यांना टेस्टसोबतच भरपूर भाज्या खायला मिळतात.या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ही बनवायला खूप सोपी आहे आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही.चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती.
 
साहित्य -
1 कप तांदूळ
 2 उकडलेले बटाटे
 1 कांदा, चिरलेला -
1 गाजर, बारीक चिरलेली 
1 कप कोबी, बारीक चिरलेली 
1 सिमला मिरची,बारीक चिरलेली 
 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली 
2 टीस्पून आले, बारीक चिरलेली 
 1 टीस्पून लाल मिरची पावडर
 1 टीस्पून काळी मिरीपूड 
चवीनुसार मीठ
 
कृती -
आलू उत्तपम बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ 5 तास भिजत ठेवा.आता भिजवलेले तांदूळ, उकडलेले बटाटे, पाणी, आले आणि हिरवी मिरची मिक्सर मध्ये वाटून घ्या. पीठ तयार झाल्यावर एका मोठ्या भांड्यात काढा, त्यात चिरलेली कोबी, गाजर, सिमला मिरची आणि कांदा, चिली फ्लेक्स, मीठ आणि मिरपूड घाला आणि चांगले मिसळा.आता तव्याला गरम करून तव्यावर पीठ दोन्ही बाजूंनी चांगले परतून  घ्या.  टेस्टी आलू उत्तपम सर्व्ह करायला तयार आहे.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

Litti Chokha बिहारचा 'लिट्टी-चोखा' घरी बनवण्याची सोपी आणि पारंपरिक रेसिपी

Foods to avoid with Milk दुधासोबत काय खाऊ नये?

World Diabetes Day 2025 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो, प्रकार, कारणे आणि उपचार जाणून घ्या

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निबंध Jawaharlal Nehru Essay 2025

Children's Day 2025 विशेष मुलांसाठी बनवा चॉकलेट पॅनकेक रेसिपी

पुढील लेख
Show comments