rashifal-2026

चमचमीत आणि चविष्ट रेस्टारेंट पद्धतीची अमृतसरी दाल

Webdunia
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (13:48 IST)
साहित्य -
1 कप अख्खी उडीद डाळ, 1/4 कप चणा डाळ, मीठ चवीप्रमाणे, 2 चमचे आलं-लसूण पेस्ट, 1/2 चमचा हळद पावडर,

फोडणी साठी -4 चमचे तूप, 1 तुकडा दालचिनी, 1 चमचा जिरे, 2 चमचे आलं-लसूण पेस्ट, 1/2 कप बारीक चिरलेला कांदा 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1कप बारीक चिरलेलं टॉमेटो, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आमसूल पूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर सजविण्यासाठी.
 
कृती -
उडीद डाळ आणि चण्या डाळीला धुऊन चार कप पाण्यात मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हळद टाकून कुकराला लावावे आणि 3 शिट्या द्यावे. गॅस बंद करा कुकराचे दाब निघाल्यावर डाळ काढून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. आता एका कढईत तूप गरम करण्यास ठेवावे. त्यामध्ये जिरे, दालचिनी घाला, नंतर आलं लसूण पेस्ट आणि कांदा घाला. कांद्याला सोनेरी रंग येई पर्यंत शिजवून घ्या. आता या मध्ये हिरव्या मिरच्या आणि टॉमेटो घाला. टॉमेटो शिजवल्यावर  तिखट, आमसूल पावडर, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला घालून मिसळा. तीन चे चार चमचे पाणी कढईत टाकावे. 
 
सर्व मसाल्यांना मंद आचेवर परतून घ्या. डाळींना कढईत टाकून परतून घ्या. 4 ते 5 मिनिटे मध्यम आचेवर मसाल्यांसह शिजवावे. आता गॅस बंद करा. कोथिंबिरीने सजवावे. गरम अमृतसरी डाळ तयार डाळ नान किंवा पराठ्यासह सर्व्ह करावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Egg Pakoda स्वादिष्ट अंडी पकोडे रेसिपी

हिवाळ्यात या ५ प्रकारच्या चटण्या जरूर खाव्यात; जेवणाची चव वाढवण्यासोबतच अनेक फायदेही मिळतात

डॉ. आंबेडकर यांच्या नावावरुन मुलांसाठी प्रेरणादायी नावे

PCOS नियंत्रित करायचे असेल तर या गोष्टींची काळजी घ्या

जेईई मेन 2026 मध्ये पूर्ण गुण मिळवण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताची तयारी कशी करावी

पुढील लेख
Show comments