Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Janmasthmi Special Rajira Pieth Puri Recipe : जन्माष्टमी साठी विशेष राजगिरा पिठाच्या पुऱ्या रेसिपी

Recipes for Vrat
, शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (12:38 IST)
Janmasthmi Special Rajira Pieth Puri Recipe : जन्माष्टमी हा मोठा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक जण उपवास धरतात. जन्माष्टमीच्या निमित्ताने उपवासासाठी खास राजगिऱ्याच्या पिठाची पुरी बनवा. चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
2 वाटी राजगिरी पीठ, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे , हिरवी कोथिंबीर, साजूक तूप, उपवासाचं मीठ,  2 उकडलेले बटाटे, तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल, 
 
कृती- 
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात राजगिऱ्याचे पीठ घ्या, त्यात उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडं साजूक तूप घालून पाणी घालून पुऱ्यांसाठी कणिक मळून घ्या. कणिक भिजवून झाल्यावर 8-10 मिनिटे कणिक बाजूला ठेवा. नंतर पुन्हा कणकेला एकसारखं मळून त्याच्या लहान लहान गोळ्या करून त्यांना लाटून घ्या. आता कढईत शेंगदाण्याचं तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा आणि  तेल गरम झाल्यावर या लाटलेल्या पुऱ्या त्यात सोडा आणि तळून घ्या. राजगिऱ्याच्या पिठाच्या गरम पुऱ्या तयार दही किंवा उपवासाची आमटी बरोबर सर्व्ह करा. 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sirsasana for Glowing Face वाढत्या वयाच्या महिलांनी करावं शीर्षासन, अनेक समस्या नाहीश्या होतील