Festival Posters

तांदूळ आणि बटाटा पासून बनवा 10 मिनिटात कुरकुरीत पकोडे, जाणून घ्या रेसिपी

Webdunia
शनिवार, 29 जून 2024 (07:00 IST)
पावसाच्या दिवसांमध्ये गरम गरम चहा सोबत कुरकुरीत पकोडे खाण्याची मज्जा काही वेगळीच असते.  भारतमध्ये चहा सोबत पकोडे खाणे जवळजवळ सर्वांना आवडते. आजच्या रेसिपमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत झटपट बनणारे कुरकुरीत पकोडे, जे तांदूळ आणि बटाटा पासून बनवले जातात. या चविष्ट स्नॅक्सला तुम्ही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनवू शकतात. चला लिहून घ्या रेसिपी 
 
साहित्य-
भिजवलेले तांदूळ 
बटाटा 
लसूण पाकळ्या 
हिरवी मिर्ची 
आले 
कढीपत्ता 
चवीनुसार मीठ 
जिरे 
कोथिंबीर 
चाट मसाला 
 
कृती-
सर्वात आधी तांदूळ दोन ते तीन तास पाण्यात भिजत घालावा. मग तांदूळ भिजल्यानंतर मिक्सरभांडे  मध्ये घालून त्यामध्ये लसूण पाकळ्या, हिरवी मिर्ची, आले, कढीपत्ता घालून पेस्ट बनवावी. तसेच बटाटा देखील मिक्सरमधून बारीक काढून घ्यावा. बटाट्याची पेस्ट तयार झाल्यानंतर तांदूळ पेस्ट त्यामध्ये मिक्स करावी. मग यामध्ये मीठ, जिरे, हिरवी कोथिंबीर, चाट मसाला घालून चांगले मिक्स करावे. आता कढईमध्ये तेल गरम करून चमच्याच्या मदतीने हे मिश्रण तेलामध्ये सोडावे. चांगल्या प्रकारे तळल्यानंतर ताटलीमध्ये काढून घ्यावे तर चला तयार आहे आपले गरम गरम तांदूळ, बटाटा पकोडे, तुम्ही हे सॉस आणि चटणीसोबत सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Christmas special recipe Plum cake ख्रिसमस फ्रूट केक

जोडीदारासमोर पादणे हे खर्‍या रिलेशनशिपची लक्षण आहेत का?

दररोज गरम पाण्याने आंघोळ करणे शरीरासाठी हानिकारक आहे, दुष्परिणाम जाणून घ्या

सरकारी संस्थांमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती सुरू, पात्रता जाणून घ्या

कच्च्या दुधाचा फेस पॅक चेहऱ्यावर चमक आणेल, असे वापरा

पुढील लेख
Show comments