Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा स्पेशल हिरवे हरभरे कबाब, जाणून घ्या रेसिपी

Webdunia
गुरूवार, 4 जुलै 2024 (16:32 IST)
Food Recipe: तुम्ही देखील पाहुण्यांसाठी काही खास बनवू इच्छित असाल तर आणि वेळ खूप कमी आहे तर जाणून घ्या हरभरा कबाब रेसिपी. हिरव्या हरभाऱ्यांमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. तसेच ही रेसिपी जशी चविष्ट आहे तशीच आरोग्यदायी देखील आहे.  
 
साहित्य-
एक वाटी हिरवे हरभरे
अर्धा कप कापलेला पालक 
पुदिना पाने 
हिरवी कोथिंबीर 
एक चमचा आले लसूण पेस्ट 
बारीक चिरलेली हिरवी मिरची 
एक चमचा भाजलेले जिरे 
अर्धा चमचा तिखट 
गरम मसाला 
धणे पूड 
हींग 
अर्धा चमचा हळद 
तांदळाचे पीठ 
 
कृती-
एका बाऊलमध्ये हरभरे घेऊन सर्व साहित्य एकत्रित करावे, मिक्सरमधून बारीक करून व पेस्ट तयार करून घ्यावी. या पेस्टचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यावे किंवा आकार देखील देऊ शकतात.आता नॉनस्टिक कढईमध्ये तेल टाकून हे सर्व बॉल तळून घ्यावे. तर चला तयार आहे आपली हरभरे कबाब रेसिपी, गरम सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

गुळाचा रसगुल्ला रेसिपी

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या भाज्या खा, आरोग्य चांगले राहील

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी: स्त्रिया आणि मुलींच्या उत्सवासाठी योग्य पर्याय

गरबा नृत्य केल्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे जाणून घ्या

पार्टनरला मेसेज पाठवताना चुकूनही या 5 गोष्टी करू नका, नात्यात दुरावा येईल

पुढील लेख
Show comments