Dharma Sangrah

झटपट शेंगदाण्याची आमटी रेसिपी; टिफिनसाठी उत्तम

वेबदुनिया फीचर टीम
मंगळवार, 28 एप्रिल 2026 (17:44 IST)
महाराष्ट्रीयन शेंगदाण्याची आमटी खूप सोपी, चटकदार आणि प्रोटीनयुक्त आहे. तर चला आज आपण पाहणार आहोत झटपट शेंगदाण्याची आमटी रेसिपी कशी बनवावी.  
 
साहित्य-
शेंगदाणे (भाजलेले) -१ कप (साली काढलेले)
खोबरे (किसलेले) -१/४कप (ताजे किंवा सुके, वैकल्पिक)
हिरव्या मिरच्या - २-३  
लसूण - ४-५ पाकळ्या 
जिरे -१ चमचा
तेल / तूप -१-२ चमचे
हळद - १/२ चमचा
मीठ - चवीनुसार
गूळ -१-२ चमचे किंवा चिंचेचा कोळ -१ चमचा 
पाणी - २-२.५ कप
कोथिंबीर 
ALSO READ: मेथी-पनीर पराठा: मुलांच्या टिफिनसाठी १० मिनिटांत हेल्दी ब्रेकफास्ट!
कृती-
सर्वात आधी मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे, खोबरे, हिरव्या मिरच्या आणि लसूण  घाला. थोडे पाणी घालून बारीक किंवा थोडे खरबरीत वाटून घ्या. आता कढईत तेल/तूप गरम करा. त्यात जिरे टाका, हळद घाला. तुम्हाला हवे असल्यास यात बारीक कापलेला कांदा आणि लसूणही घाला  त्यामुळे आणखी चव येते. वाटलेली शेंगदाण्याची पेस्ट घाला. चांगले परतून घ्या.नंतर २ कप गरम पाणी घाला. मीठ, गूळ किंवा चिंच घाला. तयार आमटीवर कोथिंबीर गार्निश करा. तर चला तयार आहे आपली झटपट शेंगदाण्याची आमटी रेसिपी, टिफीन मध्ये नक्कीच घेऊ जा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: मुलांना टिफिन मध्ये द्या चविष्ट रेसिपी; आलू पालक पनीर पराठा
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: लंचबॉक्स म्हणजे फक्त जेवण नसतं, तर तुमचं प्रेम असतं! टिफिन मध्ये द्या हे पदार्थ नवरोबा अगदी खुश होईल

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

Masala Pineapple Recipe उन्हाळ्यात आरोग्यदायी आणि ताजेतवाने करणारा नाश्ता

तुम्ही चुकीच्या वेळी लस्सी पिता का? फायद्यांऐवजी नुकसान होऊ शकते

पुढील लेख
Show comments