Festival Posters

उरलेल्या भातापासून बनवा चविष्ट फोडणीचा भात

Webdunia
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (06:36 IST)
फोडनीचा भात महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे. जो उरलेल्या भातापासून बनवता येतो. तसेच भात उरला असेल तर आपण त्यापासून फोडणीचा भात नक्कीच बनवू शकतो. ज्यामुळे उरलेला भात देखील वाया जात नाही. तसेच ही रेसिपी झटपट बनून तयार होते. तर चला जाणून घेऊ या फोडणीचा भात कसा बनवावा.
 
साहित्य-
उरलेला भात 
2 चमचे तेल 
1/2 चमचा मोहरी 
1/2 चमचा जिरे 
2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या 
8-10 कढीपत्ता पाने
1/4 चमचा हळद 
2 चमचे भाजलेले शेंगदाणे  
1 कांदा बारीक चिरलेला 
मीठ चवीनुसार 
 
कृती-
फोडणीचा भात बनवण्यासाठी सर्वात आधी गॅस वर कढई ठेऊन त्यामध्ये तेल घालून गरम करावे. आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालावे. मग मिरची आणि कढीपत्ता घालून परतवून घ्यावे. व नंतर त्यामध्ये कांदा घालून परतवून घ्या. आता यामध्ये हळद आणि मीठ घालावे. आता उरलेला भात घालून चांगल्या प्रकारे परतवून घ्या. मग यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालावे. व परतवून घ्यावे. तर चला तयार आहे आपला फोडणीचा भात, गरम सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

Malhari Martand Navratri special श्री खंडोबाला आवडणारा नैवेद्य; भरीत भाकरी पाककृती

हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर या 17 गोष्टी तुमच्या आहारात समाविष्ट करा, फायदे मिळतील

बारावी नंतर लॅब टेक्निशियन बनून करिअर करा सरकारी नोकरी मिळवा

दररोज केस धुतल्याने हे नुकसान संभवतात, केस धुणे कोणी टाळावे

हिवाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, आरोग्य टिप्स जाणून घ्या

पुढील लेख
Show comments