सर्वात आधी छोले स्वच्छ धुवून घ्यावे. व भिजत ठेवावे. तसेच आता छोले छान भिजल्यानंतर कुकरमध्ये छोले घालून मीठ घालून शिजवून घ्यावे. आता छोले शिजल्यानंतर पाणी वेगळे करून घ्यावे. तसेच एका कढईमध्ये तेल गरम करावे. आता यामध्ये जिरे व हिंग घालावे. आता यामध्ये कांदा घालावा व परतवून घ्यावा. नंतर आले लसूण पेस्ट आणि मिरचीचे तुकडे घालून परतवून घ्यावे.आता टोमॅटो घालून परतवून घ्यावे. आता यामध्ये हळद, तिखट, धणे पूड आणि जिरे पूड घालून परतवून घ्याव. हा मसाला परतल्यानंतर त्यामध्ये छोले घालावे. तसेच पाणी घालून झाकण ठेवावे व काही मिनिट शिजू द्यावे. आता तयार छोल्यांमध्ये गरम मसाला आणि आमसूल पावडर घालावी. व कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली पंजाबी छोले रेसिपी, जी तंदूरी रोटी, नान, पराठे किंवा भातासोबत नक्कीच सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.