Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरसों का साग बनवत असाल तर हॅक्स नक्की जाणून घ्या

sarso ka saag tricks and tips
Webdunia
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (22:14 IST)
हिवाळ्यात हिरव्या भाज्यांची वेगळीज मजा असते. त्यात साधारणपणे सरसों का साग हा प्रकार पंजाबची स्पेशल डिश असली तरी इतर राज्यांतील लोकही त्याचा आस्वाद घेतात. हे खाण्यात जेवढे टेस्टी लागतं तेवढेच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.
 
यात अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश देखील केला जातो ज्याने अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. हे बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास सागची मजा वाढेल-
 
हिरव्या भाज्यांचे प्रमाण- हे बनवताना कोणती भाजी किती प्रमाणात घेत आहात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बथुआ, पालक आणि सरसों का साग यांच्यासाठी अनुक्रमे १:१:२ या प्रमाणे भाज्या घेऊ शकता.

काही लोक तक्रार करतात की त्यांच्या साग कडू होतो. असे असल्यास सरसोच्या सागचे प्रमाण कमी करा आणि पालकाचे प्रमाण थोडे वाढवा. तसेच पाण्यात तुम्ही हिरव्या भाज्या उकळल्या आहेत ते पाणी गाळून वेगळे करु शकता. अशाने आपण काही पोषक गमावतो मात्र यामुळे हिरव्या भाज्यांमधील कडूपणाचे प्रमाण कमी होते.
 
साग बनवताना एक चूक टाळली पाहिजे ती म्हणजे हिरव्या भाज्या पुरेशा प्रमाणात न धुणे. अशात हिरव्या भाज्यांमध्ये माती राहते आणि याने चव बिघडते तसेच आरोग्यासाठी देखील हे योग्य नाही. म्हणून भाज्यांना पूर्णपणे स्वच्छ करा आणि मगच वापरा. आपण सर्व पालेभाज्या कापून झाल्यावर एका मोठ्या भांड्यात पाणी टाकून त्यात हिरव्या भाज्या टाकून थोडा वेळ सोडा. यामुळे माती भांड्याच्या तळाशी स्थिर होतील. यानंतर चाळणीच्या साहाय्याने दोन-तीन वेळा पाणी बदलून हिरव्या भाज्या चांगल्या प्रकारे धुवाव्या.
 
हिरव्या भाज्यांची चव वाढवण्यासाठी जर आपण लोणी वापरत असाल तर बाजारात मिळणारे सॉल्टेड बटर वापरू नका. यामुळे तुमच्या हिरव्या भाज्यांमध्ये फक्त मीठाचे प्रमाण वाढेल आणि तुम्हाला ते नक्कीच नको असणार. तुम्ही तयार केलेल्या सरसों का साग वर फक्त घरगुती मीठ रहित पांढरे लोणी घाला. यामुळे हिरव्या भाज्यांची चव खूप वाढते.
 
तुम्हाला भाजी घट्ट करायची असेल तर त्यात थोडे कॉर्नमील किंवा कॉर्न फ्लोअर आणि तूपही मिसळू शकता.


सरसों का साग रेसिपी Sarso Ka Saag Recipe 
साहित्य- सरसोंची पाने -  300 ग्राम, पालक - 150 ग्राम, बथुआ - 150, टोमॅटो - 250 ग्रॅम, हिरवी मिरची - 2, आले - 2 इंच लांब तुकडा, मोहरीचे तेल - 2 चमचे, तूप - 2 चमचे, हिंग - चिमूटभर, जिरे - 1/2 टीस्पून, हळद - एक 1/4 टीस्पून, कॉर्न फ्लोअर - 1/4 कप, लाल तिखट - 1/4 टीस्पून, मीठ - चवीनुसार
 
कृती How to make Sarson Ka Sag Recipe
मोहरी, पालक आणि बथुआ यांची पाने स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीत ठेवावीत, जेणेकरून त्यातून पाणी निघून जाईल. पाने बारीक चिरून त्यात एक कप पाणी टाकल्यावर प्रेशर कुकरमध्ये उकळण्यासाठी ठेवा. कुकरची एक शिट्टी वाजल्यानंतर गॅस बंद करा आणि प्रेशर जाऊ द्या. टोमॅटो, हिरवी मिरची आणि आले मिक्सरने बारीक वाटून घ्या.
 
कढईत तेल टाकून गरम करा. 2 चमचे तेल घालून कॉर्न फ्लोअर हलका तपकिरी होईपर्यंत परतून घ्या आणि एका भांड्यात काढून घ्या. कढईत उरलेले तेल टाकून गरम करा. त्यात हिंग आणि जिरे टाका. हिंग आणि जिरे परतल्यानंतर हळद, टोमॅटोची पेस्ट आणि लाल मिरची टाका, मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
 
सरसोंची पाने कुकरमधून काढून थंड करा आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता भाजलेल्या मसाल्यामध्ये पाने, आवश्यकतेनुसार पाणी, कॉर्न फ्लोअर आणि मीठ घालून चांगले मिसळा. भाजी उकळू लागल्यावर 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. तुमची सरसों की भजी तयार आहे.
 
यावर लोणी घालून मक्याची भाकरी, नान, पराठा किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरण्याऐवजी या गोष्टी खा

वजन कमी करण्यासाठी जगातील सर्वोत्तम व्यायाम कोणता आहे? जाणून घ्या काय फायदे आहेत

शीर्षासन करण्याची पद्धत, फायदे आणि तोटे जाणून घ्या

नैतिक कथा : मूर्ख शेळीची गोष्ट

800+ भारतीय मुलांसाठी संस्कृत नावे अर्थांसह

पुढील लेख
Show comments