Dharma Sangrah

भाज्यांचे चविष्ट आणि पौष्टीक समोसे

Webdunia
मंगळवार, 25 मे 2021 (22:21 IST)
बटाट्याचे समोसे आपण खाललेच असणार. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत भाज्या भरून केलेले समोसे.चवीला चविष्ट असण्यासह हे पौष्टीक देखील आहे.चला तर मग साहित्य आणि कृती  लिहून घ्या. 
 
साहित्य - 
2 कप मैदा,3 चमचे तेल, 1/4 चमचा ओवा,2 कांदे,3 बटाटे,1/2 कप मटार, 2 गाजर,2 हिरव्यामिरच्या,1 कप फुलकोबी,1 चमचा धणेपूड,1चमचा तिखट,1 चमचा लिंबाचा रस,चाटमसाला, मीठ चवीप्रमाणे, तळण्यासाठी तेल.
 
कृती-
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मैदा,ओवा,मीठ,लिंबाचा रस,घालून घट्ट कणिक मळून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करा त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला कांदा घालून कांदा तपकिरी होई पर्यंत परतून घ्या.या मध्ये बटाटे,मटार, गाजर,फुलकोबी सह मॅश केलेल्या भाज्या घाला. कोथिंबीर आणि चाट मसाला घाला.
आता मैद्याच्या कणकेच्या गोल लाट्या करून त्या लाट्यांना पुरीचा आकार देऊन त्याला दोन भागांमध्ये कापून घ्या.अर्ध्या भागाच्या टोकाला चिटकवून या मध्ये भाज्यांचे सारण भरा आणि टोकाला पाण्याचा हात लावून बंद करा. कढईत तेल तापत ठेवा आणि हे समोसे सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. गरम समोसे खाण्यासाठी तयार.  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Chaat Recipes Without Oil तेलाशिवाय बनवा स्वादिष्ट चाट

गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात या गोष्टींची काळजी घ्या

बीबीए अॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट मध्ये करिअर बनवा

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

अकबर-बिरबलची कहाणी : तीन रुपये, तीन गोष्टी

पुढील लेख
Show comments