Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझ्या मनाचा आरसा आहे 'माझी आई'

Webdunia
' देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी' हे गाणं ऐकलं होतं. सुरुवातीला गाण्याचा अर्थ मला लवकर कळला नाही. पण मी जेव्हा आईविषयी विचार केला, तेव्हा मला या गाण्याचा खरा अर्थ कळला. 

देव सर्वच ठिकाणी असतो असे म्हणतात. आई म्हटल्यानंतर मला खरेच देवत्वाची, त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. माझ्या साऱ्या चिंता दूर करण्यासाठी मी आजही आईच्या विचारांचा आधार घेते.

लग्नानंतर खऱ्या अर्थाने मला आईची उणीव प्रकर्षाने जाणवू लागली. लग्नाआधी आई हा एकमेव आधार होता. लग्नानंतर झालेली ताटातूट, आईला भेटण्याची उत्कट इच्छा, या साऱ्यांनी पापण्या कधी ओल्या व्हायच्या ते कळायचेच नाही. लग्नाआधी आईने दिलेल्या साऱ्या सूचना नकोशा वाटत, कधी कंटाळा तर कधी राग येई, पण आज खऱ्या अर्थाने तिच्या त्या सूचनांचा, त्या विचारांचा उपयोग मला आयुष्यात पुढलं पाऊल ठेवण्यासाठी होतोय.

आयुष्यात आपण अनेक नाती जोडतं असतो. प्रत्येक नात्यांचा काही तरी अर्थ आहे. काही नाती तडजोड असतात, काही नाती स्वार्थासाठी, काही नाती प्रेमापोटी तर काही नाती आपण केवळ पर्याय नसल्याचे स्वीकारत असतो. 'आई' हे एकमेव असं नातं आहे, ज्यात ना तडजोड आहे, ना स्वार्थ आहे, आणि ना हे नातं तात्पूरतं असतं. आई म्हणजे त्यागाची भावना, नात्यांचा ताजेपणा, मनातील
मांगल्य, आणि ओठांवरील हसू, डोळ्यांमधले आनंदाश्रू आणि विरहाची उत्कटता.

आजही दिवसभरात मन उदास झालं की आईची आठवण होते. आवडीचे पदार्थ ती खायला करून द्यायची, बाबांना मनवत मैत्रिणींसोबत चित्रपटाला जायचं म्हटलं की आधी मी आईकडे धाव घ्यायचे.

मी उदास असले, निराश झाले की दिवसभरात झालेल्या घटना ती अगदी ताज्या मनानं माझ्या जवळ बसून ऐकायची. त्या गप्पा कितीही कंटाळवाण्या असल्या तरी तिनं कधी तसं भासवलंच नाही.आजही दु:ख झालं की वाटतं एखाद्या लहान मुलाप्रमाणे धावत जाऊन आईला बिलगावं, खूप रडावं.

मला अजूनही वाटतं माझ्या मनाचा आरसा आहे माझी आई. आईला कधी माझ्या मनातील कोणतीही गोष्ट सांगण्याची गरज मला भासलीच नाही.

मी चिडले की सारा राग माझा आईवरच निघायचा. मी शांत झाले की माफी मागायचे, ति म्हणायची, अगं माझ्यावरच तुझं खरं प्रेम आहे, म्हणून तर माझ्यावर चिडण्याचा अधिकार तू मला दिलास. खरंच आई, मी आज स्वतः आई झाल्यावर मला कळतंय आई बनणं इतकं सोपं नाही. फक्त एकच विनंती आहे, माझ्या पाठीशी सदैव राहा.. अशीच.

- रुपाली बर्वे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

प्रत्येक नात्यात गोडवा आणि सकारात्मकता असली पाहिजे

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

हिवाळ्यात ही गोष्ट पाण्यात उकळून प्या, आरोग्यासाठी वरदान आहे

तुमच्या केसांमध्ये सलूनसारखा ओलावा हवा आहे? या घरगुती उपायाचा अवलंब करा

हिवाळ्यात मुळ्याच्या पानांची चटणी खाण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments