Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई विमानतळावर सोन्याची १२ किलो वजनाची बिस्किटे जप्त

Webdunia
मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (08:15 IST)
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने सुदानी प्रवाशांकडून ५ कोटी ३८ लाख रुपये किमतीचे सोन्याची १२ किलो वजनाची बिस्किटे जप्त केली. सुदानी प्रवाशांचा हा गट दुबईहून एमिरेट्स फ्लाइट AK-500 ने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेला होता.
 
सुमारे २३ सुदानी लोकांच्या एका गटाने एकत्र येऊन कस्टम अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी गोंधळ निर्माण करून ग्रीन चॅनल मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सुदानी प्रवाशांनी सीमाशुल्क आगमन क्षेत्रात मुद्दाम गोंधळ घातला तसेच अधिकाऱ्यांसमोर आरडाओरड करून आक्रमक पवित्रा घेतला आणि काही जण मारामारी देखील करू लागले. मात्र सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी हा प्रकार अतिशय व्यावसायिकतेने हाताळला. पुरेशी कुमक घेऊन त्यांनी या आक्रमक प्रवाशांना आवरलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सीमाशुल्क आगमन क्षेत्रात मुद्दाम गोंधळ निर्माण करून धूर्तपणे सोने घेऊन पलायन करायचा त्यांचा डाव होता.
 
गोंधळ करून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या एका प्रवाशाने परिधान केलेल्या खास डिझाइन केलेल्या पट्ट्यात लपवून ठेवलेल्या प्रत्येकी एक किलो वजनाची १२ सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क अधिकार्‍यांच्या प्रभावी आणि जलद कारवाईमुळे हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी सीमाशुल्क अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणूनबुजून वेगळे वर्तन करणाऱ्या अन्य पाच प्रवाशांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
 
चौकशीतून असे निष्पन्न झाले की मुंबई विमानतळावर आलेले हे सहा प्रवासी नियोजित कट कारस्थान करून गोंधळ निर्माण करून सोने घेऊन पलायन करणाऱ्या प्रवाशाला मदत करणार होते. या पाच प्रवाशांनी सोने तस्करी करण्याच्या पूर्वकल्पित कटाचा भाग असल्याची कबुली दिली असून ज्या प्रवाशाकडून सोने जप्त करण्यात आले त्याच्यासह त्यांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्वांना २३ सप्टेंबर पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय तपासणीत अडथळा निर्माण करणाऱ्या इतर सहा प्रवाशांना देखील पकडण्यात आले. मुंबई विमानतळ कार्यालयाच्या, ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या मदतीने या सहा प्रवाशांना काळ्या यादीत टाकून सुदानला परत पाठवण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

सर्व पहा

नवीन

गडचिरोली येथे एसएजीमध्ये तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

समय रैनाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले; रणबीर इलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांना चौकशीसाठी समन्स जारी

जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतात अनेक पाकिस्तान असते- राज्यपाल राधाकृष्णन

सरकार येत-जात असते, आदित्य ठाकरे केजरीवालांना मित्र म्हणून भेटले

राहुल गांधींना भेटण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीत पोहोचले

पुढील लेख
Show comments