Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई पोलिसांच्या एका 47 वर्षीय कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Webdunia
शनिवार, 6 जुलै 2024 (09:17 IST)
पालघर येथे मुंबई पोलिसांच्या एका 47 वर्षीय कॉन्स्टेबलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.कैलास टेकाडे असे या मयत कॉन्स्टेबलचे नाव असून ते एकटेच राहत होते. विरारच्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या भावाने त्यांच्याशी संपर्क केल्याच्या प्रयत्न केला असून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. भावाने त्याच्या मित्राला घरी जाण्यास सांगितले.मित्र घरी पोहोचल्यावर घराचा दरवाजा बाहेरून बंद दिसला. मित्राने अर्नाळा सागरी पोलिसांना माहिती दिली. 

पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि दरवाजा तोडला. त्यांना टेकाडे छताला लटकलेल्या अवस्थेत दिसले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांनी आत्महत्या का केली अद्याप कळू शकले नाही .या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.    

Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments