Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पालघर मधील समुद्रकिनाऱ्याजवळ हिरवी पांढरी संशयास्पद बोट दिसली

Webdunia
सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (08:04 IST)
महाराष्ट्रातील पालघरमध्ये किनाऱ्यावर एकच गोंधळ झाला कारण समुद्रकिनाऱ्याजवळ एक संशयास्पद बोट आढळून आली लोकांनी मोबाईलचे टॉर्च सुरु करताच बोट समुद्रात निघून गेली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार पालघरमधील समुद्रकिनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळून आली आहे ही बोट पाहिल्यानंतर पोलिसांनी एक ॲडव्हायझरी जारी करून कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि सर्वसामान्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. पोलिसांनी तटरक्षक दलाला शोध मोहीम राबविण्याची विनंती करण्यात आली आहे. 3 ऑक्टोबरला मध्यरात्री डहाणू तालुक्यातील चिखले गावाजवळ स्थानिक लोकांनी एक संशयास्पद बोट पाहिली आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली.
 
मिळालेल्या माहितीनुसार ही बोट समुद्रकिनाऱ्याजवळ होती, परिसरातील बोटीपेक्षा मोठी आणि रुंद दिसत होती. पण स्थानिक लोकांनी मोबाईलचे फ्लॅश लाईट आणि दुचाकींचे हेडलाईट वापरून पाहण्याचा प्रयत्न केला असता, बोट अरबी समुद्रात निघून गेली. तसेच संशयास्पद हिरवी आणि पांढरी बोट शोधण्यासाठी तटरक्षक दलाने हेलिकॉप्टर तैनात केले आहे.
 
तसेच पालघर पोलीस अधिकारींनी सागरी व खडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले आहे. तसेच स्थानिक मासेमारी समित्यांशी संपर्क साधून पोलीस याबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

नागपुरात प्रेमाला नाकारल्यावरआरोपीचा महिलेला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न

भारतीय हवाई दलाचा 'एअर शो मध्ये आकाशात दिसले रॅफेल आणि सुखोई

लातूरच्या शासकीय वसतिगृहाच्या अन्नातून 50 विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात दाखल

ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी महंत यती नरसिंहानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला

मंगळुरूमधील कोल्लूर पुलाजवळ व्यावसायिकाची कार सापडली, पोलिसांचा शोध सुरु

पुढील लेख
Show comments