Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Baba Siddique Murder : बहराइचमधून मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले

Webdunia
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (17:02 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळी झाडून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बहराइच येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हरीशकुमार बलकाराम (23 वर्षे) असे ताब्यात घेतलेल्या एकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीशचे महाराष्ट्रातील पुणे येथे भंगाराचे दुकान असून बाबा सिद्दीकी खून प्रकरणात अटक करण्यात आलेला धरमराज कश्यप आणि फरार आरोपी शिवकुमार हा हरीशच्या दुकानात काम करायचा. 

पोलिसांचे म्हणणे आहे की, हरीशने काही दिवसांपूर्वी दोघांना नवीन मोबाईल फोन दिले होते. या घटनेबाबत हरीशला आधीच सर्व माहिती होती, असा पोलिसांचा विश्वास आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, त्यांना संशय आहे की हरीश देखील या कटाचा एक भाग आहे आणि त्यानेच शूटर्सना पैसे आणि इतर मदत केली होती. 

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पटियाला तुरुंगात रचल्याची गुप्तचर माहिती पंजाब पोलिसांना मिळाली आहे. लॉरेन्सच्या गुंडाने जालंधरमधील आरोपी जीशान अख्तर याला जेलमध्येच बाबा सिद्दिकीची हत्या करण्याचे कंत्राट दिले होते.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Maharashtra Election 2024 Date महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर एकाच टप्प्यात मतदान

Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, 23 तारखेला मतमोजणी

Assembly Polls Dates Announcement : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू,महाराष्ट्र-झारखंड निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार

मुंबईत जमावाकडून तरुणाला बेदम मारहाण ,आईने वाचविण्याचा प्रयत्न केला ओव्हरटेकिंगचा वाद बनले कारण

पुढील लेख
Show comments