Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील हाजी अली दर्ग्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, पोलिसांनी सुरु केला तपास

Webdunia
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (10:37 IST)
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याच्या ट्रस्टला गुरुवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने फोन केला. व त्या व्यक्तीने मशिदीच्या आवारात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. याशिवाय त्यांनी दर्ग्याबाबत वादग्रस्त विधानेही केली होती. तसेच यानंतर ट्रस्टने या प्रकरणाची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह घटनास्थळी पोहोचून तपास केला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील हाजी अली दर्ग्याला गुरुवारी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्या व्यक्तीने दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात फोन करून आवारात बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी सांगितले की, संध्याकाळी 5 वाजता हा कॉल आला होता.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याने अपशब्द वापरले आणि दर्ग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. याबाबत हाजी अली दर्ग्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
 
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि बॉम्बशोधक पथकाने दर्ग्यात पोहोचून तपासणी केली, पण काहीही संशयास्पद आढळून आले नाही. तारदेव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. 

Edited By- Dhanashri Naik 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुण्यात चार तरुणांनी तरुणीवर केला लैंगिक अत्याचार, दोन जणांना अटक

महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट घोषित, देशातील या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पतीचे दुस-या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे पत्नीने घटस्फोट मागितल्यावर पतीने ॲसिड फेकले

मुसळधार पावसानंतर मुंबईतील परिस्थितीवर आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला धरले धारेवर

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली, बॉम्बे रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments