Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करावी!: अशोक चव्हाण

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (15:12 IST)
मुंबई- आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने संवैधानिक संरक्षण द्यावे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्राने मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीबाबत प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मार्गात अनेक संवैधानिक व कायदेशीर बाबींचे पेच आहेत. हे पेच दूर करण्यासाठी संसदेच्या पातळीवर आवश्यक ती संवैधानिक तरतूद करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास मराठा आरक्षण व देशातील इतरही अनेक राज्यांच्या आरक्षणाचे प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी, यासाठी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी पुढाकार घेऊन पंतप्रधानांना विनंती करावी, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी यावेळी केले. 
 
सर्वोच्च न्यायालयातील एसईबीसी आरक्षण प्रकरणाची सुनावणी ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष व्हावी, ही राज्य सरकारची भूमिका जवळपास मान्य झाल्यासारखी आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ८ ते १८ मार्चपर्यंतच्या तारखा जाहीर केल्या आहेत. १ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज ऑनलाईनऐवजी प्रत्यक्षपणे होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही सुनावणी प्रत्यक्ष रूपात होईल, अशी अपेक्षा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 
 
एसईबीसी आरक्षण प्रकरणामध्ये १८ मार्च रोजी अॅटर्नी जनरल यांनी भूमिका मांडावी, असे सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितले. 
 
केंद्र सरकारसाठी ही एक चांगली संधी आहे. अॅटर्नी जनरल यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन अनुकूलता दर्शवली तर त्यातून चांगलेच निष्पन्न होईल. त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल काय भूमिका मांडतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष राहणार असल्याचे अशोक चव्हाण पुढे म्हणाले.

संबंधित माहिती

भारतामध्ये राष्ट्रीय शोक घोषणा

एक्सपोर्ट होणाऱ्या मसाल्यांमध्ये इथाईलीन ऑक्साइडला घेऊन सरकारने घोषित केली गाइड लाइन

मला पाकिस्तानी चाहते खूप आवडतात, रोहित शर्माचे मोठे विधान

12वीचा निकाल आज लागणार

अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजी नगर मधून अटक

2.44 कोटी रुपयांची कार, परवाना किंवा नोंदणी नाही; पुण्यातील अपघातात अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक

राज्यात 17 जिल्ह्यात कोसळणार पाऊस, अवकाळी पावसाचा इशारा

'सीतेला चोरायला रावण देखील भगवे कपडे घालून आला होता',सीएम योगी यांबद्दल महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षांचा वादग्रस्त जबाब

Bus Accident : मध्य प्रदेशातील राजगडमध्ये भीषण रस्ता अपघात,बस पुलावरून खाली कोसळली, 2 ठार 52 प्रवासी जखमी

Pune Porsche Accident:अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, सीसीटीव्ही फुटेज वरून उघड

पुढील लेख
Show comments