rashifal-2026

तौक्ते चक्रीवादळ : ताशी 114 किमी वेगाने वार, झाडांची पडझड मुबंईत प्रचंड विनाश ,लोकल रेल सेवा बाधित

Webdunia
सोमवार, 17 मे 2021 (19:26 IST)
चक्रीवादळ तौक्तेने सोमवारी मुंबई व आसपासच्या भागात विनाश केला. चक्री वादळाच्या मार्गात जे काही आले त्याने त्याला झपाटले.  या चक्री वादळाचा परिणाम असा झाला की मुंबईत मुसळधार पाऊस झाला आणि ठिकठिकाणी झाडे उपटून पडली. महाराष्ट्रात चक्रीवादळाच्या या विध्वसांनंतर आता हे चक्रीवादळ  मंगळवारी गुजरातमध्ये कहर करणार आहे, तर केरळ, कर्नाटक आणि गोव्यात या चक्रीय वादळामुळे बऱ्याच  जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या तौक्ते चक्री  वादळामुळे मुंबईच्या लोकल रेल सेवा देखील बाधित झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  मुंबईत ताशी114 किमी वेगाने वारं सुटले.  बृहन्मुंबई महानगर महामंडळाने (बीएमसी) दुपारी सांगितले की, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) पुढच्या काही तासांत जोरदार पाऊस आणि ताशी 120 किमी वेगाने वारे चालण्याचा इशारा दिला आहे. सध्या मुंबई व त्याच्या आसपासच्या भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार गडगडाटासह पाऊस पडत आहे.
 
मुंबईत सतत मुसळधार पावसाचा इशारा
"आयएमडीने पुढील काही तास मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे,"आयएमडी मुंबईचे अधिकाऱ्यांनी सांगितले की वेगाने वारे वाहण्याची शक्यता बघता बांद्रा-वरळी सी लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि लोकांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.दक्षिण मुंबईतील कुलाबा भागात आजअकराच्या सुमारास वाऱ्याचा वेग ताशी 102 किमी वेगाने नोंदविण्यात आला जो आजचा सर्वात वेगवान वारा आहे.रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, जवळच्या ठाण्याकडे जाणाऱ्या रेल्वेवर झाड पडल्यानंतर मध्य रेल्वेची उपनगरी घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान उपनगरी रेल्वे सेवा अर्ध्या तासासाठी खंडित झाली होती.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यात दोन दिवसांत दोन ठिकाणी बिबट्या दिसला

२०३२ पर्यंत मुंबईची प्रतिमा बदलेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केली भव्य वाहतूक योजना

मुंबई विमानतळावर बनावट पासपोर्टसह नेपाळी महिलेला अटक

सद्गुरु मुंबईत दिवसभराचा प्रगत-ध्यान कार्यक्रम आयोजित करणार

चीनमध्ये अरुणाचलमधील महिलेला गैरवर्तनाचा सामना करावा लागल्यावर भारताने केला तीव्र निषेध

पुढील लेख
Show comments