Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिकवणीच्या आडून 'तो' दहशतवादी कृत्यांना करायचा मदत

Webdunia
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (08:33 IST)
मुंबईतील अतिरेकी घातपात कटाच्या तपासात मुंब्रा कनेक्शन उघड झालं आहे.यात मुंब्रा इथून रिझवान मोमीन या संशयित अतिरेक्याला अटक करण्यात आली आहे.रिझवान हा बीएससी शिक्षित असून तो आपल्या घरीच दहावीपर्यंतची शिकवण्या घेत असे.मात्र या शिकवणीच्या आडून तो दहशतवादी कृत्यांना मदत करत असल्याचा आरोप एटीएसने ठेवला आहे. 
 
रिझवानने एटीएसच्या अटकेत असलेल्या जाकीर हुसेन शेखला दहशतवादी कृत्यात मदत केली असल्याची माहिती असून त्याचा मोबाईल त्याने तोडून पुरावा नष्ट करण्यासाठी गटारात फेकून दिला होता.तपासात एटीएसने हा तुटलेला मोबाईल शोधून काढला आहे.रिजवान याच्या मुंब्रा इथल्या घराची दहशतवाद विरोधी पथकाकडून घरझडती घेण्यात आली असता त्यामध्ये काही संशयास्पद दस्तऐवज मिळून आल्याने ते ताब्यात घेण्यात आले आहेत.
दिल्लीत सहा अतिरेकी अटक झाल्यानंतर मुंबई कनेक्शन उघड झालं होतं मुबंईतल्या धारावीमधून जान मोहम्मद शेख या अतिरेक्याला अटक करण्यात आली होती.आता जान मोहमद शेखचे या दोघांसोबत आणि परदेशातील कनेक्शन तपासले जात आहेत. 
 
जाकीर हुसेन शेख या अतिरेक्याला मुंबईतून अटक केल्या नंतर आज रिजवान मोमीनला अटक करण्यात आली. जाकीर आणि रिझवान यांचे परदेशी अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. परदेशातील अॅंथोनी नामक अतिरेक्यांशी यांचे संबंध असल्याची माहिती असून हा अतिरेकी कुख्यात गँगस्टर दाऊदच्या जवळचा आल्याची माहिती कळते आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

पुण्यात बीएमडब्ल्यूमधून उतरून श्रीमंत वडिलांच्या मुलाने केली रस्त्याच्या मधोमध लघुशंका

अंतिम सामन्यापूर्वी शुभमन गिलचे आयसीसीच्या विशेष पुरस्कारासाठी नामांकन

यूट्यूब ने भारतातून 29 लाखांहून अधिक व्हिडिओ डिलीट केले

महिला दिनानिमित्त राजस्थान रॉयल्सने 'पिंक प्रॉमिस' जर्सी लाँच केली

पुढील लेख
Show comments