Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम ; पाणी कपातीची पालिकेची घोषणा

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम ; पाणी कपातीची पालिकेची घोषणा
, बुधवार, 2 मार्च 2022 (07:35 IST)
भातसा विद्युत केंद्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे.सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
 
मुंबई महानगरासाठी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील भातसा धरणातून दररोज सुमारे २ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी भातसा येथील १५ मेगावॅट विद्युत केंद्रांमध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये जवळजवळ ४० टक्के कपात झाली आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. सध्या उपलब्ध होणार्‍या पाणीपुरवठ्यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरात १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आठवडाभरात नवीन‎ कुलगुरू मिळणार‎ : राज्यपालांची माहिती