Festival Posters

महापरिनिर्वाण दिन ऑनलाईन साजरा होणार, चैत्यभूमीवरून शासकीय मानवंदनेचे थेट प्रक्षेपण होणार

Webdunia
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (09:17 IST)
महापरिनिर्वाण दिनी राज्यासह देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो अनुयायी 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदा चैत्यभूमीवरून शासकीय मानवंदनेचे थेट प्रक्षेपण होणार असून महामानवाला घरबसल्या अभिवादन करता येणार आहे. 
 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेता यंदा राज्य शासनासह महानगर पालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महापरिनिर्वाण दिन निमित्ताने दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे सुरू असलेल्या पूर्वतयारीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली. चैत्यभूमी भागातील पुष्प सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती आदी सर्व नियमित कामांचा आढावा आयुक्त जयस्वाल यांनी घेतला. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 
 
कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध घातले आहेत. या कारणाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांना फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी २१ एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी संपावर, सरकारचा कडक इशारा

राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूवर एका वर्षाची बंदी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली कारवाई

LIVE: महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी २१ एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी संपावर

हर्षा ऋचरिया हर्षानंद गिरी बनल्या, उज्जैनमध्ये संन्यास घेतला, संतांचा विरोध

पुढील लेख
Show comments