Marathi Biodata Maker

एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांची आयुक्तांविरोधात घोषणाबाजी

Webdunia
बुधवार, 6 जानेवारी 2021 (08:30 IST)
वसईत परिवहन सेवेच्या उद्घाटनासाठी आलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी  कार्यकर्त्यांना बेदम चोप देत बाहेर काढले.
 
या घटनेत  कार्यक्रम सुरू असताना प्रेक्षकांत बसलेल्या दोन मनसे कार्यकर्त्यांनी अचानक उठून आयुक्त गंगाथरन डी. यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. आयुक्त मनसे कार्यकर्त्यांना भेटत नसल्याने मनसेच्या आयुक्तांवर राग होता. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची रणनिती आखली होती. ‘आयुक्त साहेब वेळ द्या’ अशी घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांनी केली. या अनपेक्षित प्रकाराने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ धाव घेत या दोन्ही कार्यकर्त्यांना चोप देत बाहेर नेले. या नंतर पुढील कार्यक्रम पार पडला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

सहा वर्षांच्या मुलीवर निर्भया प्रमाणे अत्याचार, गुप्तांगात रॉड घालून जखमी केले, आरोपीला अटक

नायजेरियात सैनिकांनी निदर्शने करणाऱ्या महिलांवर गोळीबार केला, 9 महिलांचा मृत्यू

अमेरिकेने 85,000 व्हिसा रद्द केले, व्हिसा मुलाखती पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलल्या

टी20 मध्ये हार्दिक पांड्याने' खास शतक करत रोहित-विराट क्लबमध्ये सामील झाले

पुढील लेख
Show comments