Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Triple Talaq in Mumbai College पती कॉलेजमध्ये मौलवी घेऊन आला आणि पत्नीला दिला तिहेरी तलाक

Webdunia
सोमवार, 4 मार्च 2024 (12:24 IST)
Triple Talaq in Mumbai College मुंबईत तिहेरी तलाकचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नवी मुंबईतील तळोजा परिसरात एका 43 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसमोर ‘तिहेरी तलाक’ दिला. आश्चर्यकारक बाब म्हणजे पतीने आपल्यासोबत मौलवी आणि एका वकिलालाही साक्षीदार म्हणून आणले होते.
 
अल्ताप मुबारक अत्तार असे आरोपी पतीचे नाव असून तो व्यवसायाने चालक आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा 2019 (तिहेरी तलाक प्रकरण) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही घटना घडली होती. मात्र महिलेने गुरुवारी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
 
22 ऑगस्ट 2017 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकची प्रथा असंवैधानिक ठरवत ऐतिहासिक निकाल दिला.
 
आरोपी अल्तापच्या लग्नाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना पहिल्या लग्नापासून 15 आणि 13 वर्षांची मुले आहेत. तळोजा येथील फेज-1 मध्ये हे दाम्पत्य गेल्या 10 वर्षांपासून राहत होते. पीडित महिला खारघर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात लिपिक म्हणून काम करते. अलीकडेच तिला समजले की अल्तापचीही दुसरी पत्नी आहे.
 
याबाबत पीडितेने पतीला विचारले असता, त्याने तिच्यावर अत्याचार करून मारहाण केली. त्यानंतर महिलेने नवी मुंबई पोलिसांच्या महिला कक्षात याबाबत तक्रार केली.
 
दरम्यान गतवर्षी 7 डिसेंबर रोजी पती दोन मौलवीसोबत कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेला होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्नी आपल्या सहकाऱ्यांसोबत तेथे चहा पीत होती. आरोपी पतीने पत्नीकडे बोट दाखवून मौलवींना सांगितले की ती त्याची पत्नी आहे. त्यानंतर त्याने तीनदा तलाकचा उच्चार केला आणि पत्नीला तिहेरी तलाक देऊन तेथून निघून गेला.
 
खारघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीला पत्नीच्या दैनंदिन व्यवहाराची माहिती होती. त्यामुळे त्याची पत्नी संध्याकाळचा चहा घेण्यासाठी तेथे जात असतानाच तो मौलवींसोबत कॉलेज कॅन्टीनमध्ये पोहोचला. जेणेकरून तिहेरी तलाक सर्वांसमोर देता येईल आणि साक्षीदारही तिथे उपस्थित असतील. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत आहे, तोपर्यंत सलोखा होऊ शकत नाही-सुप्रिया सुळे

रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर महिलेचा मृत्यू

कटिहारमधील छठ घाटाजवळ भीषण आग

वायनाडमध्ये आपत्ती निवारणाचे आश्वासन देऊनही मोदींनी मदत केली नाही खर्गे यांचा आरोप

जम्मू-काश्मीर मध्ये दोन ग्रामरक्षक ठार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच

पुढील लेख
Show comments