Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यात सीबीआय अधिकारी म्हणून ऑनलाइन 59 लाख रुपयांची फसवणूक

Webdunia
शुक्रवार, 6 डिसेंबर 2024 (17:31 IST)
महाराष्ट्रातील ठाणे शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कथित गुन्हेगारी कारवायांसाठी सायबर फसवणूक करणाऱ्यांनी कस्टम्स आणि सीबीआय अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून त्याच्यावर कारवाई करण्याची धमकी दिल्याने 59 लाख रुपयांची फसवणूक केली. 

सदर घटना 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान घडली असून पीडित ला एकाच व्यक्तीचे बऱ्याच वेळा कॉल आले. त्याने स्वतःला दिल्लीचे कस्टम अधिकारी सांगून तुमच्या नावाचे एक पार्सल मिळाले आहे आणि त्यामध्ये ड्रुग्स मिळाले आहे. आणि प्रकरण पुढील तपासणीसाठी सीबीआयला पाठवत असल्याचे  सांगितले. त्याने पीडितेला सहकार्य करण्यासाठी एक कॉल घेण्याचे म्हटले. 

नंतर पीडित ला एका सीबीआय अधिकारी बनून एकाने कॉल केला आणि पीडितचे नाव मनी लॉन्डरिंग मध्ये असल्याचे सांगितले. प्रकरण मिटवण्यासाठी त्याला काही पैसे द्यावे लागणार असे सांगण्यात आले.त्याला 59 लाख रुपयांची मागणी केली.भीतीपोटी पीडित ने पैसे वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले. नंतर याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने तातडीनं पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 318 (4) (फसवणूक) आणि 319(2) (तोतयागिरी करून फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला.
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्तंडभैरवाष्टक

खंडोबा मंदिर पाली सातारा

Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

सर्व पहा

नवीन

कोणत्याही VVPAT स्लिप आणि EVM नंबरमध्ये तफावत नाही...', महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले

गौतम अदानी यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

तुर्कीमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश,6 जवानांचा मृत्यु

LIVE: गौतम अदानी यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

बीडमध्ये कार-ट्रकच्या धडकेत चौघांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments