Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PalGhar : जयपूर - मुंबई एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानाचा गोळीबार, चार जणांचा मृत्यू, आरपीएफ जवानाला अटक

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2023 (11:59 IST)
जयपूर - मुंबई सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये आज सकाळी पालघरच्या जवळ गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात आरपीएफ जवानासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या आरपीएफ जवानाला जीआरपीने अटक केली आहे.जयपूर- मुंबई (गाडी क्र 12956) ही मुंबई सेंट्रलच्या दिशेने जात होती.
 
या घटनेबाबत अधिक माहिती देताना पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले, “चेतन कुमार हा आरपीएफ जवान ड्युटीवर होता. त्याने त्याचा सहकारी टीकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला.
 
या गोळीबारात 3 सहप्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. नंतर त्याने चेन ओढली आणि दहीसर आणि मीरा रोडच्या मध्ये उतरला. त्याला भाईंदरच्या आरपीएफ टीमने अटक केली. त्याची चौकशी सुरू आहे. मृत पावलेल्या तीन नागरिकांची ओळख पटवण्याचं कामही सुरू आहे.”
 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी 5.23 वाजता, ट्रेन क्रमांक 12956 जयपूर एस मध्ये बी5 मध्ये गोळी असल्याची माहिती मिळाली. एस्कॉर्ट ड्युटीमध्ये सीटी चेतनने एस्कॉर्ट इनचार्ज एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली . ट्रेन बोरिवली रेल्वे स्थानकावर पोहोचली आहे. माहितीनुसार, ASI व्यतिरिक्त 3 नागरीकांचा मृत्यू झाला आहे.या जवानाला पकडण्यात आले आहे 
 
आरोपीचा हेतू काय होता आणि त्याने ही गोळी का चालवली हे समजू शकले नाही. सुदैवाने या गोळीबारात आणखी प्रवासी जखमी झाले नाहीत. चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार  होताच ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस ट्रेनमधील प्रवाशांचे जबाबही नोंदवत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेची अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचं ते पुढे म्हणाले.




Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला

LIVE: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

जानेवारीत मिळू शकते मोठी भेट, 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार

RBI गव्हर्नर रुग्णालयात दाखल, चेन्नईमध्ये उपचार सुरू

पुढील लेख
Show comments