Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कटप्पाला जनता माफ करणार नाही, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर घाणाघाती टीका

Webdunia
गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (08:16 IST)
मुंबई – दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ठाकरेंनी शिंदेंना गद्दार आणि देशद्रोही म्हटले. हे सिंहासन आपल्या शिवसैनिकांचे आहे. शिवसैनिकांना धमकावण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र तुम्ही शिवसैनिकांवर अन्याय केल्यास ते खपवून घेणार नाही. तसेच कटप्पा हा गद्दार निघाला. त्याला जनता कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही, अशी जोरदार टीका ठाकरे यांनी केली.  असे सेनाप्रमुख म्हणाले. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘रावण’ वेगळा आहे.
 
“यावेळी रावण ५० खोके वाला”
ठाकरे पुढे म्हणाले की, यंदाचा रावण हा ५० खोके वाला आहे. पक्ष बदलण्यासाठी आमदारांना ५० कोटी रुपयांची कथित ऑफर देण्यात आली. यंदा रावण वेगळा आहे. रावणाला १० डोकी असायची. पण या रावणाकडे ५० आहेत. शिवसेनेचे काय होणार? असा प्रश्न ज्यांना पडला होता त्यांनी इथली गर्दी पहावी. येथे एकही माणूस पैसे घेऊन आलेला नाही. हे एकनिष्ठ सैनिक आहेत. भाजपने माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले.
 
“जनता कटप्पाला माफ करणार नाहीत”
ठाकरे बरसले की, कटप्पाला जनता माफ करणार नाही. शिवसैनिकांच्या सिंहासनावर एकाच शिवसैनिकाचाच अधिकार असणार आहे. ते गद्दार आहे आणि गद्दारच राहतील. आनंद दिघे हे शेवटच्या क्षणापर्यंत शिवसैनिक होते. हे लोक शिवसेनेचे नाव चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे लोक काही काळ खुर्चीवर बसणार आहेत. त्यांना भविष्य नाही. कुणासमोरही घाबरण्याची गरज नाही, नतमस्तक होण्याची गरज नाही. माझे नाव फक्त उद्धव ठाकरे नाही तर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, असे ते म्हणाले.
 
भाजपकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही
ठाकरेंनी स्पष्ट केले की, भाजपकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. आम्ही भाजपशी युती तोडली याचा अर्थ आम्ही हिंदुत्व सोडले असे नाही. मी आजही हिंदू आहे आणि नेहमीच हिंदूच राहीन. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेटायला गेले होते. “पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन माथा टेकवणाऱ्यांकडून आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही,” अशी टीका ठाकरेंनी केली.
 
शिंदे शिवसेनाप्रमुख होण्याच्या लायकीचे नाहीत
ठाकरे म्हणाले की, त्यांची (एकनाथ शिंदे) शिवसेनाप्रमुख होण्याची लायकी नाही. तुम्ही पात्र आहात का? तुम्हाला तुमची स्वतःची कल्पना आहे का? तुम्ही (बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करून) इतरांच्या बापाची चोरी करता. तुमच्यात हिम्मत असेल तर तुमच्या वडिलांचे नाव वापरून निवडणुकीला सामोरे जा. ते गद्दार आहेत आणि त्यांची ही ओळख पुसली जाऊ शकत नाही. मंत्रिपद काही दिवसांसाठी असते, पण गद्दाराचा शिक्का आयुष्यभरासाठी असतो.”, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.

Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात मृत व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

ठाण्यात २.२१ लाख रुपयांचा गुटखा जप्त, तर लग्न समारंभात हवेत रिव्हॉल्व्हर चालवल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments