rashifal-2026

नवी मुंबईतील डोंबिवलीसह 'या' भागात शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी वीज बंद

Webdunia
शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (08:15 IST)
महापारेषणकडून शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी १ दरम्यान २२० केव्ही पडघा ते पाल आणि २२० केव्ही पडघा ते जांभूळ या अतिउच्चदाब वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवली, उल्हासनगर दोन आणि कल्याण पूर्व विभागातील महावितरणच्या काही ग्राहकांची वीज काही काळ बंद राहणार आहे. यासंदर्भात वीज ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठवून पूर्वकल्पना देण्यात येणार असून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
 
डोंबिवली पश्चिमेतील पुढील भागांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते दुपारी १ दरम्यान बंद राहणार आहे. गरिबाचा पाडा व नवापाडा फिडर, तुकारामनगर फिडरवरील नव चेतन, सुदंरा कॉम्प्लेक्स, लक्ष्मण रेषा, मल्हार बंगलो, गावदेवी मंदिर, अंबरयोग, अयरेगावचा, सावरकर रोड, गोपाल नगर, गल्ली नंबर १ आणि २, पेंडसेनगर, टिळकनगर, पोस्ट ऑफिस चौक, आरपी रोड, संत नामदेव पथ, वसंतवाडी, चार रस्ता, गोपालनगर २, ३ व ४, जिजाई नगर, अंबिका नगर, गोग्रासवाडी, पाथर्ली रोड, शिखंडेवाडी, स्टार कॉलनी, मानपाडा रोड, आर अँड टी कॉलनी, संत समर्थ मठ, हनुमान मंदिर रोड, गांधीनगर, जुनी डोंबिवली, कोपर रोड. 
 
कल्याण पूर्व विभागातील पुढील भागांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत बंद राहील – नांदिवली, सांदप, भोपर, उसरघर, देसलेपाडा, सोनारपाडा, मानपाडा, ललीतकाटा, लोढा हेवन, कटाई, निळजे परिसर, हेदुटणे, घेसर, उंभर्ली, कोळे, घारीवली, भंडारी पाडा, वैभव नगरी, मिलापनगर, सुदर्शन नगर, एमआयडीसी रहिवासी परिसर, सागाव खालचा पाडा व वरचा पाडा, चेरा नगर, शंखेश्वर नगर, भगवान पाटील व सुरेश पाटील कंपाऊंड, म्हात्रे नगर, तुकाराम वाडी, पाटील महाविद्यालय परिसर, रिजंन्सी, दावडी गाव, शंकरनगर, हॉरिझॉन मायसिटी व कासारिओ तसेच कासाबेला बिल्डिंग परिसर, मंगरुळ, उसटणे, उसटणे इंडस्ट्रिज पार्क, नऱ्हेन, पाली, चिरड, वाडी, करवले, पालेगाव, चिंचवणी, खोणी, काकडवाल, नेवाळी, नेवाडी पाडा, खरड, कुंभार्ली, पोसरी, शेलारपाडा, ढोका, कोळसेवाडी, म्हसोबा चौक, सिद्धार्थ नगर, मच्छी मार्केट, प्रभू राम नगर, जिम्मी बाग, शाहू गार्डन, लोकग्राम, लोकवाटिका, लोकधारा, नेतीवली नाका, मराठी शाळा, पुणे लिंक रोड, चिकनी पाडा, तिसगाव, शिवाजी कॉलनी, विजयनगर, विशालनगरी, घारडा केमिकल कंपनी, बीएआरसी, पलावा.
 
उल्हासनगर दोन विभागात पुढील भागात सकाळी ८ ते दुपारी १ दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे – प्रेमनगर, हिरापुरी, शहा मार्केट, दशहरा मैदान, ओंकारानंद आश्रम, निजधाम, तहसिलदार दुधनाका, कैलास कॉलनी, वंसतबहार, समतानगर, गायकवाड पाडा एक व दोन, आकाश कॉलनी एक, कोळेकर पाडा, दूर्गा पाडा, आकाश किराणा, जेमनानी कंपाऊंड, शांतीप्रकाश आश्रम, साई आर्केड, ओटी सेक्शन, कुर्ला कँप रोड, श्रीराम नगर, एकता नगर, आकाश कॉलनी, बारा नंगर बस स्टॉप, मानेरा, व्हिनस, संभाजी नगर, लालचक्की, गजानन नगर, कुर्ला कँप, आशेळे पाडा, आशेळे गाव, गणपत नगर, नेताजी पाणीपुरवठा, उल्हासनगर चार व पाच विभाग, बारकू पाडा, रिलायन्स, पालेगाव, अंबरनाथ एफ टाईप एमआयडीसी विभाग, इंडस्ट्रियल भाग, अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, आनंदनगर एमआयडीसी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

बेल्जियमने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत अझलन शाह हॉकीचे विजेतेपद जिंकले

गडचिरोलीमध्ये ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ज्यात कुख्यात कुमलीचाही समावेश

वॉशिंग्टनमध्ये हल्ला झालेल्या नॅशनल गार्ड सैनिकांचा ट्रम्प सन्मान करतील

LIVE: गडचिरोलीमध्ये ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

पुढील लेख
Show comments