Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल, उद्या होणार पायावर शस्त्रक्रिया

Webdunia
मंगळवार, 31 मे 2022 (12:21 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्या 1  जून रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे. गेल्या  काही दिवसांपासून ते पायाच्या आजाराने त्रस्त आहे. ते 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते, मात्र त्यांच्या पाय दुखू लागल्यामुळे त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला. त्यानंतर त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले आणि उद्या त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे. 
 
पुण्यात घेतलेल्या सभेत त्यांनी पायाचा कोणता आजार झाला आहे, हे सांगितले त्यांनी सांगितले की कामानिमित्त पुण्यात येत असताना वाटेत त्यांचे पाय दुखू लागले प्रचंड वेदनेमुळे मुंबईला परतावे लागले आणि काही चाचणी केल्यावर डॉक्टरांनी हिपबोनची शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले. आता उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून त्यांना दोन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार. त्यांच्या विश्रांतीच्या काळात मनसेचे पदाधिकारी आणि नेते राज्यात विधानसभा स्तरावर जाहीर सभा आणि परिषदा घेतील.असे मनसे नेते बाळा नांदगावकरांनी सांगितले. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments