Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई पालिकेच्या मंड्यांमध्ये महिला बचत गटांना व्यवसायासाठी प्रशासनाकडून हक्काची जागा

Webdunia
शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (15:08 IST)
मुंबई पालिकेच्या मंड्यांमध्ये महिला बचत गटांना व्यवसायासाठी प्रशासनाकडून हक्काची जागा उपलब्ध करून दिली जाणार असून या उपक्रमांतर्गत पालिकेने सात ठिकाणे निश्चित केली आहेत. मुंबईकरांना भाजीपाला किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी महापालिकेने मंड्यांची सुविधा केली आहे.
 
मुंबईत सध्या महापालिकेच्या ९१ मंड्या कार्यरत असून या मंड्यांचा पालिकेमार्फत विकास केला जात आहे. माहीमचे गोपी टैंक मार्केट, दादरचे क्रांतिसिंह नाना पाटील मार्केट, नळ बाजार परिसरातील मिर्झा गालिब मार्केट आणि ग्रँट रोडच्या लोकमान्य टिळक मार्केटचा कायापालट केला जात आहे. या पाचही मंड्यांमध्ये २ हजार ५९६ गाळेधारक आहेत. मुंबईत गरजू महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटाच्या व्यवसायासाठी जागा मिळणे मुश्कील ठरते. खासगी जागा घेणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर पालिका मंड्यांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
पे अँड पार्किंगचे कंत्राट देणार
गरजू महिलांना रोजगार देण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून शिलाई मशीन, घरघंटीचे वाटप करण्यात येते. शिवाय महिलांना पालिकेच्या पे अँड पार्किंगचे कंत्राट महिला बचत गटांना देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात बचत गटांच्या आर्थिक सक्षमतेसाठी मंड्यात भाडेतत्त्वावर जागा देण्यात येणार असल्याने गरजू महिलांच्या आर्थिक सक्षमतेला हातभार लागणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी दिली.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

Delhi AAP Manifesto मध्यमवर्गीयांसाठी अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली, केंद्रासमोर ठेवली ७ कलमी मागणी

सर्वोच्च न्यायालयाने ईडीची याचिका फेटाळत छगन भुजबळांना तुरुंगात जाण्यापासून रोखले

कुत्र्याने घेतला बदला... धडकल्याच्या १२ तासांत वाहन मालकाचे घर शोधले, रात्री कार ओरबाडली

LIVE: सर्वोच्च न्यायालयाने भुजबळांना तुरुंगात जाण्यापासून रोखले

भीषण आगेत 76 जणांचा होरपळून मृत्यू

पुढील लेख
Show comments