Festival Posters

मुंबई-सिंधुदुर्ग विमान सेवेला तूफान प्रतीसाद

Webdunia
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (22:41 IST)
मुंबई-सिंधुदुर्ग विमान सेवेला अद्याप सुरुवात झालेली नाही. दरम्यान, चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबरला होणार आहे. त्यादिवसापासूनच विमान सेवा सुरु होणार आहे. मात्र, या विमान सेवेला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. विमानाचे कालपासून बुकिंग सुरु झाले आणि तासाभरात 20 ऑक्टोबर 2021पर्यंतचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
 
मुंबई-सिंधुदुर्ग विमान सेवेला तुफान प्रतिसाद पाहता ही सेवा अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे. मुंबई - सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग - मुंबई अशी विमाना सेवा एअर इंडियाकडून सुरु होणार आहे. या विमान सेवेची ऑनलाईन तिकीट विक्री सुरु करण्यात आली आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग आणि परतीचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. अवघ्या तासाभरात 20 ऑक्टोबरपर्यंतची तिकिटे संपली.
 
सिंधुदुर्गच्या विमानसेवेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. एअर इंडियाने तिकीट विक्रीला सुरुवात केली, पण अवघ्या तासाभरातच 20 ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती एअर इंडियाच्या संकेतस्थळावर दिसत आहे.  
 
एअर इंडियाच्या ‘अलायन्स एअर’ या उपकंपनीमार्फत मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमान उडणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्गसाठी 2520 रुपये तर सिंधुदुर्ग ते मुंबई परतीच्या प्रवासासाठी 2621 रुपये तिकीट दर आहे. दररोज सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान दुपारी 1 वाजता चिपी येथे उतरेल. तर परतीचा प्रवास दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल आणि विमान 2 वाजून 50 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

पत्नीने तिच्या पतीसाठी दोन गर्लफ्रेंड्स शोधल्या, एका धक्कादायक नात्याची एक अनोखी कहाणी

भारतीय सैन्याचा सुलतान, Rifle mounted Robots पाहून शत्रूचे मनोबल खचले

OYO हॉटेलमध्ये तरुणीची हत्या: बेपत्ता झाल्यानंतर २४ तासांनी मृतदेह सापडला, वारंवार चाकूने वार

LIVE: पुण्यातील ससून रुग्णालयाने इतिहास रचला, TNDM शी जोडलेल्या नवीन उत्परिवर्तनाची पुष्टी केली

मुंबईत मसाज थेरपिस्टने महिलेवर हल्ला केला... केस ओढले, मुक्का मारला, मुलाला देखील ढकलले, व्हि‍डिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments