Dharma Sangrah

सुप्रिया सुळे यांची संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर चपराक लगावणारी पोस्ट

Webdunia
गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (12:10 IST)
वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी मंत्रालय परिसरात महिला पत्रकाराविषयी केलेले वक्तव्य गाजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आले असताना मंत्रालयाबाहेर एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा 'तू आधी कुंकू लावून ये, मगच तुझ्याशी बोलेन', असे ते म्हणाले.
 
'आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,' अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला दिली होती.
 
यावेळी भिडे गुरूजी म्हणाले की, आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो. या वक्तव्यानंतर संभाजी भिडे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली असून सुप्रिया सुळे यांनी देखील यावर चपराक लगावणारी पोस्ट केली आहे. त्यांनी हेरंब कुलकर्णी यांनी लिहीलेली कविता पोस्ट केली आहे. 
 
मी लावतो टिळा
 
तू लाव टिकली
 
परंपरेच्या बाजारात
 
अक्कल आम्ही विकली
 
मी लावतो भस्म
 
तू लाव कुंकू
 
गुलामीचा शंख
 
दोघे मिळून फुंकू
 
तू घाल मंगळसूत्र
 
मी घालतो माळ
 
मनूने मारलेली रेषा
 
मनोभावे पाळ
 
तू घाल बांगड्या
 
माझ्या हातात गंडा
 
मुकाट्याने ऐक नाहीतर
 
आमच्या हातात दंडा
 
मी घालतो मोजडी
 
तू जोडवे घाल
 
सप्तपदी च्या मर्यादेत
 
जन्मभर चाल
 
तू घाल अंबाडा
 
मी शेंडी राखतो
 
विज्ञानाच्या प्रगतीला
 
परंपरेने झाकतो
 
मी घालतो टोपी
 
तू घाल बुरखा
 
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
 
एकमत आहे बर का...!!!
 
मी धोतरात, तू शालूत
 
होऊ परंपरेचे दास
 
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
 
महाराष्ट्राचा प्रवास .....!!!!!
 
हेरंब कुलकर्णी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

धक्कादायक! १६ वर्षीय विद्यार्थिनीने दिली परीक्षेपाठोपाठ वॉशरूममध्ये बाळाला दिला जन्म; परिसरात मोठी खळबळ.

LIVE: महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्सची अनिश्चित काळासाठी संप; ई-चलनविरोधात आंदोलन

Maharashtra Transport Strike महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्सची अनिश्चित काळासाठी संप; ई-चलनविरोधात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणार नाही, शरद पवार नातू पार्थसोबत राज्यसभेत जातील

IND vs ENG: संजू सॅमसन सेमीफायनलमध्ये खेळणार नाही का? सोशल मीडियावर अचानक ट्रेंडिंग सुरू झाले; संपूर्ण प्रकरण काय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments