Dharma Sangrah

मेट्रो-३ मार्गावरील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा पार

Webdunia
बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (21:14 IST)
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (मुं.मे.रे.कॉ.) च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर  ४२ वा व प्रकल्पातील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा पार पडला. अपलाईन मार्गावरील या भुयारीकरणास एकूण ४३ दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये ५५८ काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला.
 
मेट्रो-३ मार्गातील सर्वात लांब पट्ट्यांपैकी एक असलेल्या पॅकेज-३ मध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. पॅकेज-३ अंतर्गत महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतची ८३७ मीटरची सर्वात आव्हानात्मक भुयारीकरणाचे काम रॉबिन्सच्या टीबीएम तानसा-१ ने यशस्वीरित्या पूर्ण केले.
 
मेट्रो-३ च्या भुयारी मार्गाचे काम १००% पूर्ण झाले या क्षणाचे साक्षीदार होताना याचा मला अतिशय आनंद होत आहे. हा मार्ग मुंबईच्या ऐतिहासिक वारसा इमारती, जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती, सध्याचा मेट्रो मार्ग, रेल्वे मार्ग, नदी व कठीण भौगोलिक रचना असलेला परिसर आदींच्या खालून व अगदी जवळून जात असल्याने मेट्रो-३ साठी भुयारीकरण करणे खूपच आव्हानात्मक होते, असे मत मुं.मे.रे.कॉ.च्या व्यवस्थापकीय संचालकअश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

सासरी पोहोचल्यानंतर चार तासांत वधूचा पळून जाण्याचा प्रयत्न; चौकशीत 'बनावट लग्न' करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

LIVE: महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ६५ वसतिगृहे उघडली

सरकारी विद्यापीठे आरएसएस ताब्यात घेत आहे! रोहित पवारांच्या आरोपांमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ

पुढील लेख
Show comments