Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तौक्ते : समुद्रातून सुटका केलेल्यांना घेऊन INS कोची दाखल, 14 जणांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 19 मे 2021 (16:01 IST)
मुंबईजवळच्या समुद्रात बुडलेल्या P 305 बार्जवरून सुटका केलेल्या 184 पैकी काही जणांना घेऊन नौदलाचं INS कोची जहाज मुंबईत दाखल झालंय. या जहाजावरून 14 मृतदेहही आणण्यात आले आहेत. ONGCचे अनेक कर्मचारी अजूनही बेपत्ता असून नौदलाची शोध मोहीम सुरू आहे.
 
तर नौदलाचं INS कोलकाता जहाज सुटका करण्यात आले्या इतर कर्मचाऱ्यांना घेऊन दुपारी दाखल होईल.
 
P 305 बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते. बॉम्बे हाय जवळच्या समुद्रात ही बार्ज तौक्ते चक्रीवादळादरम्यान बुडली.
 
केवळ नौदलामुळे आज आपण जिवंत असल्याचं या बार्जवरून सुटका करण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याने ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
या बार्जवरच्या 184 जणांची सुटका करण्यात आली तर INS तेग, INS बेटवा, INS बिआस, P81 विमान आणि सी किंग हेलिकॉप्टर्स बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.
सुटका करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा तपशील ONGC आणि Afcons कंपन्यांना देण्यात आला असून या बार्जवरच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना माहिती मिळावी म्हणून काही फोन नंबर्स देण्यात आले आहेत.
 
AFCONS हेल्पडेस्क :कुलदीप सिंग - +919987548113, 022-71987192प्रसून गोस्वामी - 8802062853ONGC हेल्पलाईन : 022-26274019, 022-26274020, 022-26274021
 
P 305 बार्ज ही भारतात तेल उत्पादन करणाऱ्या ONGC कंपनीची असून तौक्ते वादळाच्या तडाख्यामुळे या बार्जला समुद्रात रोखून धरणारे नांगर निघाले.
 
नौदलाने गेल्या काही काळात राबवलेल्या सर्वांत कठीण बचाव मोहीमांपैकी ही एक मोहीम आहे. गल कन्स्ट्रक्टर या आणखी एका बार्जवरील 137 जणांनाही नौदल आणि तटरक्षक दलानं मंगळवारी सहीसलामत वाचवलं. कुलाबा पॉइंटपासून भरकटलेलं हे जहाज पालघरमधल्या माहिमजवळ गेलं होतं.
foto: साभार ट्विटर 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments