suvichar

नवी मुंबई शहरात आठवड्यातून एकवेळ पाणीकपात

Webdunia
मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (15:16 IST)
नवी मुंबई शहरात आठवड्यातून एकवेळ पाणीकपात  करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर विभागवार नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता पाणीकपातीचे संकट शहवासीयांवर आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात 20 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र काही भागात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने विभागवार आठवड्यातून एकवेळ संध्याकाळी पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी आजपासून ऐरोली भागातून सुरू होणार आहे.
 
नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून आणि एमआयम्डीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. मोरबेतून पाणीपुरवठा सुरळीत आहे. पण एमआयडीसीतून 80 दशलक्ष लीटरऐवजी 60 ते 62 दशलक्ष लीटर पुरवठा होत आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या विभागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे प्रत्येक भागात सुरळीत पाणी देण्यासाठी महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये विजयाने सुरुवात केली

बंगळूरु मधील युगांडाच्या महिलेत इबोलाची लक्षणे, रुग्णालयात दाखल

जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी विशेष

पेट्रोलचा खर्च संपेल, एमजी कॉमेट ईव्ही खरेदी करण्यापूर्वी या ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

LIVE: 'हा' मोठा पक्ष शिंदे सेनेत विलीन होणार!

पुढील लेख
Show comments