Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

३८ महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये ६३० दहशतवाद्यांचा केला खात्मा

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (23:14 IST)
जम्मू-काश्मीरमध्ये मे २०१८ पासून जून २०२१ दरम्यान कमीत कमी ६३० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. त्यांनी सांगितले की, ‘यादरम्यान ४०० एन्काऊंटर्स झाले असून यामध्ये ८५ जवान शहीद झाले आहेत.’ केंद्रीय गृहराज्य मंत्री मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते.
 
पुढे नित्यानंद राय म्हणाले की, ‘दहशतवाद्यांबाबत सरकारची जीरो टॉलिरेंस धोरण आहे. सरकारकडून येथे सुरक्षा सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. देशद्रोही घटनांविरोधात कडक कायदे लागू करण्यात आले आहेत. तसेच दहशतवादी संघटनांचा सामना करण्यासाठी सातत्याने शोधमोहिम राबवली जात आहे. दहशतवाद्यांना जे लोकं मदत करत आहेत, त्यांच्यावर सुरक्षा दल बारीक नजर ठेवून आहेत. यासोबत त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे.’
 
जून २०२१ पर्यंत पाकिस्तानने सीमेपलीकडून गोळीबार करून जम्मू -काश्मीरमध्ये ६६४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. दरम्यान मार्च महिन्यात येथे सीमेपलीकडून गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या घटना घडल्या नाही झाली. द्रमुकचे खासदार तिरुची सिवा यांच्या उत्तरात त्यांनी राज्यसभेत सांगितले की, ‘२०१९ मध्ये जम्मू -काश्मीरमध्ये यूएपीए कायद्यांतर्गत १ हजार ९४८ लोकांना अटक करण्यात आली. याशिवाय ३४ जणांना शिक्षा सुनावण्यात आली.’

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments