Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

JNU मध्ये पुन्हा हंगामा, ABVP ने AISA, SFI नेत्यांवर हल्ला केल्याचा आरोप, अनेक जखमी

JNU मध्ये पुन्हा हंगामा, ABVP ने AISA, SFI नेत्यांवर हल्ला केल्याचा आरोप, अनेक जखमी
, सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (11:23 IST)
दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कॅम्पसमध्ये 14 नोव्हेंबरला रात्री ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनांच्या सदस्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. 
 
वसंतगंज पोलिस ठाण्यात त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आल्या असून हाणामारीचीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र, या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असल्याचे पोलीसांनी सांगितले. जखमी विद्यार्थ्यांना एम्स आणि सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
 
दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की ABVP आणि डाव्या सदस्यांनी नोंदवलेल्या तक्रारींची चौकशी चालू आहे. ABVP ने आरोप केला आहे की त्यांचे काही सदस्य विद्यार्थी कक्षात बैठक घेत होते तेव्हा काही डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी बैठकीत अडथळा आणला आणि नंतर हाणामारी झाली. 
 
ABVP ने म्हटले आहे की AISA आणि SFI च्या विद्यार्थ्यांनी ABVP च्या महिलांसह सदस्यांवर हल्ला केला आणि त्यांच्या सदस्यांना गंभीर दुखापत झाल्याचा दावा केला आहे.
 
घटनेबद्दल आखिल भारतीय विद्यार्थी परिषदने म्हटले की जेएनयूमध्ये एबीवीपीचे अनेक कार्यकर्त्यांवर वामपंथी गटांवर हल्ला केला. पीडितांमध्ये एबीवीपी पदाधिकारी, मुली आणि दिव्यांग विद्यार्थी देखील सामील आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र: रत्नागिरी भूकंपाने हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 4.0 होती