suvichar

गायी तस्करी कराल तर मराल - भाजपा आमदार अहुजा

Webdunia
मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (09:40 IST)
पुन्हा एकदा भाजपा आमदार चर्चेत आले आहेत. यामध्ये आमदारांनी धमकी दिली आहे. यामध्ये नेहमीच राजस्थान येथील आमदार चर्चेत असतात. अश्याच प्रकारे   भाजपाचे आमदार ज्ञानदेव अहुजा त्यांच्या पुन्हा एकदा  एका वक्तव्यामुळे चर्चेत आले. यामध्ये ज्ञानदेव अहुजा यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आणि  नवा वाद ओढवून घेतला आहे. यामध्ये त्यांनी सरळ धमकी दिली असून ते म्हणतात की  गायींची तस्करी आणि हत्या करणाऱ्यांना लोकांचा मार खाऊन जीव गमवावा लागणार आहे.अलवार जिल्ह्यात गायींची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आले होते. झाकीर नावाचा एक व्यक्ती ट्रकमधून अवैधपणे गायींना कत्तलीसाठी घेऊन निघाला होता. यामध्ये  अलवरच्या खिलोरा गावाजवळ स्थानिकांनी झाकीरचा ट्रक पकडला होता. या गाडीमध्ये आठ गुरं होती. झाकीर गायींची तस्करी करत असल्याच्या संशयावरून जमावाने त्याला बेदम मारहाणही केली.पोलिसांनी वेळीच त्याला सोडवले होते. या घटनेला उद्देशून ज्ञानदेव अहुजा यांनी हे वादग्रस्त विधान केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments