Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिव्हिल सेवा २०२० च्या परिक्षांची तारीख स्थगित

सिव्हिल सेवा २०२० च्या परिक्षांची तारीख स्थगित
, गुरूवार, 21 मे 2020 (09:28 IST)
संघ लोक सेवा आयोग, युपीएससी (Union Public Service Commission, UPSC) सिव्हिल सेवा २०२० च्या परिक्षांची तारीख स्थगित करण्यात आली आहे. ही परिक्षा ३१ मे रोजी घेण्यात येणार होती. या परिक्षांबाबतच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येणार होती. मात्र ती काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर  २० मे रोजी युपीएससी सिव्हिल सेवा २०२० च्या परिक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात येणार होते. मात्र काही कारणास्तव त्याची घोषणा होऊ शकली नाही. आयएएस प्रीलीअम्स आणि भारतीय वन सेवा प्रारंभिक परिक्षांची तारीख अधिकृत वेबसाइटवर जाहीर होणार असून स्पर्धकांना अधिक माहितीसाठी upsc.gov.in या साइटवर जाता येणार आहे.
 
संघ लोक सेवा आयोगाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात युपीएससी २०२० च्या परिक्षांचे वेळापत्रक पुन्हा कधी जाहिर करण्यात येईल, याचा उल्लेख केलेला नाही. यामध्ये केवळ २० मे रोजी परिक्षेच्या वेळापत्रकाची घोषणा होणार नाही, इतकेच नमूद करण्यात आले आहे. परिस्थितीचा आढाव घेऊन पुढील तारीख जाहिर करू, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परिक्षांना बसणाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. युपीएससी परिक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) सह इतर भारतीय सेवांकरता अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. त्याच्या माध्यमातून ७९६ पदांची भरती होती. त्यापैरी २४ पद हे दिव्यांगांसाठी राखीव असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोणतेही कार्ड नसलेल्याना मोफत पाच किलो तांदूळ