Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड विनाश, 3 जण ठार, 4 बेपत्ता, एनडीआरएफचे बचाव कार्य सुरू

Webdunia
सोमवार, 19 जुलै 2021 (11:56 IST)
देहरादून. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी मुळे एका 3 वर्षाची मुलगी आणि तिची आई सह एका कुटुंबातील तीन जण ठार झाले तर एक जण बेपत्ता आहे.तीन दिवसांपासून राज्यात बर्‍याच ठिकाणी संततधार पाऊस पडल्याने सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे.
 
मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत सांगितले की जिल्हा दंडाधिकाऱ्यांना प्राथमिकतानुसार मदत व बचाव कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.मी भगवंतांकडे पीडित झालेल्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.दुसरीकडे, देहरादून जिल्ह्यातील विकासनगर भागात छिबरो जलविद्युत प्रकल्पात अडकलेल्या दोन मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कारवाई सुरू आहे
 
उत्तरकाशीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितले की,रविवारी रात्री उशीरा उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोरी रोडवरील मांडव गावात ढगफुटीमुळे घरात पाणी शिरले आणि त्यामध्ये एकाच घरातील माधुरी देवी (36),ऋतु देवी (32)आणि तिची तीन वर्षाची एक मुलगी तृष्वी मरण पावले. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
 
ते म्हणाले की, घटनास्थळाजवळील कंकराडी गावात आणखी एका व्यक्तीची  मातीच्या ढीगाऱ्याखाली बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे, ज्याचा शोध मोहीम सुरू आहे.मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांची माहिती मिळताच पोलिस आणि राज्य आपत्ती निवारण दलाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले आणि बर्‍याच लोकांना सुखरूप काढले.
 
दरम्यान, उत्तराखंड सरकारने हाती घेतलेल्या यूजेव्हीएन लिमिटेडच्या छिबरो जलविद्युत प्रकल्पात रविवारी अडकलेल्या दोन मजुरांची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू आहे.कालसी पोलिस ठाण्याचे अधिकारी ऋतुराज सिंह म्हणाले की, देहरादून जिल्ह्यातील विकासनगर भागात असलेल्या प्रकल्पातील बोगद्यात सकाळी तीन कामगार कामावर गेले होते, तेथे ऑक्सिजनच्या अभावामुळे ते बेशुद्ध झाले.मात्र, पुन्हा चैतन्य मिळविल्यानंतर एक मजूर बाहेर आला ज्याने तेथे आणखी दोन मजूर अडकल्याची माहिती दिली. दोन्ही मजुरांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम सुरू असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
 
दुसरीकडे,गेल्या तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे गंगा, यमुना,भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी, पिंडर,नंदाकिनी,टोंस, सरयू,गोरी,काली,रामगंगा इत्यादी सर्व नद्या ओसंडून वाहत आहे.ज्यांच्या वर सतत लक्ष दिले जात आहे.  बर्‍याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी अडकले आहेत, ते उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे.अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे घरात आणि शेतात माती शिरली आहे.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments