Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादीत्य सिंधीया भाजपमध्ये प्रवेश करणार ?

Webdunia
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (14:56 IST)
मध्यप्रदेशच्या राजकारणात मोठा गोंधळ होण्याची शक्‍यता
 
कर्नाटकनंतर आता मध्य प्रदेशच्या कॉंग्रेसमध्ये मोठ्या संघर्षाची ठिगणी पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. मध्यप्रदेशच्या कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ हे आज कॉंग्र्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल होणार आहेत. या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत पण कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादीत्य सिंधीया यांनीदेखील या पदावर आपला दावा केला आहे त्यामुळे येत्या काळात त्यांना हे पद मिळाले नाही तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, अजूनही कमलनाथच या पदाचे काम पाहत असल्याने पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. या पदासाठी ज्योतिरादित्य सिंधीया इच्छूक असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसमोर सिंधीया यांनी या पदासाठी आपला दावा सांगितला असल्याचे सांगण्यात येत आहे,. तसेच जर सिंधीया यांना हे पद मिळाले नाही तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात आहे.

संबंधित माहिती

Lok Sabha Election 2024 : मुंबईतील 6 जागांवर आज मतदान, 35000 पोलीस तैनात, केंद्रीय दलेही सज्ज

Lok Sabha Election 2024 : मुंबईत पाचव्या टप्प्यातील मतदान आज, लोकसभेच्या कोणत्या जागांवर आणि कोण उमेदवार आहे जाणून घ्या

RR vs KKR : कोलकाता-राजस्थान सामना पावसामुळे रद्द

सात्विक-चिराग जोडी विजेती ठरली, लिऊ आणि चेन यांना पराभूत केले

SRH vs PBKS : हैदराबादने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला

पुढील लेख
Show comments