Festival Posters

सोनिया गांधी यांचा कमांडो सहा दिवसांपासून बेपत्ता

Webdunia
गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (09:28 IST)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला विशेष सुरक्षा गटातील (एसपीजी) कमांडो सहा दिवसांपासून बेपत्ता आहे.  राकेश कुमार (३१) कमांडो असे नाव आहे. 

राकेश कुमार हा द्वारका परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. १ सप्टेंबर रोजी राकेश कुमार ड्युटीवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. घरातून निघताना तो गणवेशातच होता. १० जनपथ येथे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आल्यावर त्याने सहकाऱ्यांची भेट घेतली. काही वेळाने तो तिथून निघून गेला. जाताना तो रिव्हॉल्व्हर आणि मोबाईल फोन बंगल्यावरच ठेवून गेला. राकेश कुमारला अतिरिक्त वेळ थांबावे लागल्याने तो घरी आला नाही, असे सुरुवातीला त्याच्या कुटुंबियांना वाटत होते. मात्र दोन दिवस उलटूनही राकेशशी संपर्क होत नसल्याने त्यांनी १० जनपथ गाठले. राकेश कुमार बेपत्ता असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली. 

राकेश कुमारला १ सप्टेंबररोजी सुट्टी होती. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही तो घरातून ड्यूटीसाठी का निघाला असा प्रश्न तपास यंत्रणांना पडला आहे.  सोनिया गांधींच्या सुरक्षा ताफ्यातील कमांडो बेपत्ता झाल्याची दखल सुरक्षा दलांनीही गांभीर्याने घेतली आहे. दिल्ली पोलीस या कमांडोचा शोध घेत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments