Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अश्लील चाळे करणाऱ्याला पकडण्यासाठी २५ हजारांचे बक्षीस जाहीर

crime in delhi
Webdunia
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (08:41 IST)

दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी २५ हजार रुपये बक्षीस  जाहीर केलं आहे.  याप्रकरणात वसंत विहार परिसरात एका चालत्या बसमध्ये विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ७ फेब्रवारी रोजी रुट नंबर ७७४ वर धावणाऱ्या एका बसमध्ये ४०-४५ वयाच्या एका व्यक्तीने विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे केले होते. आरोपी अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडिओही एका विद्यार्थीनीने मोबाईमध्ये बनवला होता. या व्हिडिओत आरोपीचा चेहरा कैद झाला आहे.

या व्हिडिओच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीचा फोटो काढून पोस्टर तयार केले आहेत. हे पोस्टर ठिकठिकाणी चिटकवण्यात आले असून या मार्गावर धावणाऱ्या बसेस, रिक्षा चालकांमध्येही वाटण्यात आले आहेत.हा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला होता. या घटनेची पोलिसांत तक्रार केल्यानंतरही आरोपीला अद्याप पकडण्यात यश आलेलं नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख