Festival Posters

हा तर जनतेचा मोदींवर असलेला विश्वास

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2017 (16:09 IST)
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  जनता भाजपासोबत असून मोदींचे विकासकारण देशाला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 
 
गुजरात विधानसभा निवडणुकीत विरोधात वारे वाहत असतानाही राज्यातील सत्ता टिकवण्यात  भाजपाने यश मिळवले आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून आणण्यात भाजपाना यशस्वी झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. "विकास आणि विश्वासाला गुजराती जनतेने पाठिंबा दिला आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाला आहे." असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments