rashifal-2026

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, दूध, भाजीपाल्याची टंचाई

Webdunia
शुक्रवार, 2 जून 2017 (11:35 IST)

राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. शहरांची नाकाबंदी करुन आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आजपासून अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे.  नवी मुंबईत जिथे दररोज 500 गाड्यांची आवक होते, तिथे आज फक्त दीडशे गाड्यांची आवक झाली आहे. तर कल्याणमध्ये सकाळपासून भाजीचा एकही ट्रक आलेला नाही. त्यामुळे कल्याणमधील व्यापारी कालच्याच उरलेल्या भाज्या विकत आहेत.  याशिवाय, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ 10 टक्के आवक झाली आहे. बाजार समितीत फक्त 110 गाड्या आल्या आहे.  तर ठाणे, मनमाड, येवला, लासलगावमध्येही भाजीपाल्याची गाडी आली नाही.

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments