Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय जवानांकडून चार दहशतवादी ठार

Four terrorists
Webdunia
सोमवार, 27 एप्रिल 2020 (16:21 IST)
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम परिसरात रविवारी रात्री उशीरा झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केले आहे. मात्र, या चकमकीत भारतीय लष्करातील एक मेजर जखमी झाल्याचे समजते. या चकमकीदरम्यान काही दहशतवादी पळून गेले. हे सर्वजण कुलगामच्या लोवरमुंडा परिसरात लपून बसले आहेत.  गुडर येथे चार दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर भारतीय लष्कराने मोठा शस्त्रसाठा जप्त केला. 
 
प्राथमिक माहितीनुसार, संध्याकाळी अस्थल आणि चेहलान परिसरात राष्ट्रीय रायफल्सचे जवान गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी अचानकपणे हल्ला चढवला. भारतीय जवानांनी तात्काळ हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी पोलिसांचे विशेष कृती दल (SOG) पथकही त्याठिकाणी मदतीला आले. या दोन्ही दलांनी मिळून रात्री उशीरापर्यंत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीदरम्यान एका मेजर पदावरील अधिकाऱ्याच्या पायात गोळी लागली. या अधिकाऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख
Show comments