Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्रुप कॅप्टन वरूण सिंहांना बंगळुरूला केले एअरलिफ्ट

ग्रुप कॅप्टन वरूण सिंहांना बंगळुरूला केले एअरलिफ्ट
, गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (18:06 IST)
तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हेलिकॉप्टर क्रॅशमधील एकमेव बचावलेल्या ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांच्या तब्येतीशी संबंधित एक अपडेट समोर आले आहे. हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये जीव गमावणाऱ्या सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचे पार्थिव शरीर आज दिल्ली येथे दाखल होईल. पण दुर्घटनेत बचावलेले एकमेव वरूण सिंह यांच्यावर वेलिंगटन येथील रूग्णालयात दाखल आहेत. सध्या ते लाईफ सपोर्ट सिस्टिमवर आहोत. त्यांचे जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. वरूण सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांना बंगळुरू येथे एअरलिफ्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आज सकाळीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वरूण सिंह यांच्याबाबतचे अपडेट दिले होते. ते लाईफ सपोर्टवर असून त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. वरूण सिंह यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा या अपघातातील आगीत भाजल्याने झाल्या आहेत. त्यांचे वडिल कर्नल केपी सिंह (निवृत्त) यांनी सांगितले होती की वरूणला बंगळुरूला शिफ्ट करण्यात येऊ शकते. त्यानुसार वरूणला एअरलिफ्ट करण्यात आले आहे. (Group Captain Varun Singh airlifted to bengaluru as critical health on life support)
 
याआधी ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांच्या तब्येतीशी संबंधित एक अपडेट न्यूज एजन्सी एनएनआयने दिले होते. त्यानुसार वरूण सिंह यांची तब्येत अत्यंत नाजुक असल्याचे बोलले जात होते. त्यामुळेच गरज पडल्यास वरूण सिंह यांना वेलिंगटन हॉस्पिटल येथून बंगळुरूच्या कमांड हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येईल, असाही अंदाज वर्तवण्यात येत होता. ग्रुप कॅप्टन वरूण सिंह हे प्रतिष्ठेच्या अशा डीएसएससी येथे संचालक आहेत. सुलूर एअर बेसच्या ठिकाणी त्यांनी जनरल रावत यांचे स्वागत केले, त्यानंतर वेलिंगटनसाठी ते रवाना झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिपीन रावत हेलिकॉप्टर अपघात : ‘मी त्या भाजलेल्या माणसाला म्हणालो, घाबरू नका, आम्ही तुम्हाला वाचवू’