Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पती-पत्नीचा वाद झाला आणि चिमुकलीला भोगावी लागली शिक्षा, अन्न-पाण्यावाचून मुत्यू

Webdunia
शनिवार, 11 मे 2024 (12:59 IST)
छत्तीसगडच्या मुंगेली मध्ये माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे. जिथे एक महिला सरपंच आपल्या 3 वर्षाच्या मुलीला जंगलात सोडून आली. सांगितले जात आहे की या मुलीचा शोध घेण्यात आला. पोलिसांना तिचा मृतदेह मिळाला. अन्न-पाणी मिळाले नसल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाला आहे. हे पूर्ण प्रकरण मुंगेली जिल्ह्यातील लोरमी क्षेत्रातील खुडिया परिसरातील आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील गाव पटलपरहाची महिला सरपंच हिचे आपल्या पतीसोबत कडाक्याचे भांडण झाले. पण या भांडणाचे परिणाम 3 वर्षाच्या चिमुकलीला भोगावे लागले. पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर ती महिला सरपंच आपली 3 वर्षाची मुलगी आणि 1 वर्षाचा मुलगा यांना सोबत घेऊन घरातून निघून गेली. तिचे माहेर गावापासून 25 किलोमीटर असल्याची माहिती मिळाली. डोक्यात राग असल्याने या महिलेले आपल्या मुलीला जंगलात सोडून दिले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोध सुरु केला. चार दिवसाच्या शोध मोहीम नंतर पोलिसांना त्या चिमुकलीचा मृतदेह मिळाला. अन्न-पाणी मिळाले नाही म्हणून या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या चिमुकलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा योगा करतानाचा व्हिडिओ व्हायरल

मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला योग्य होता, कारण मी शाहरुख-सलमानची हिरोईन बनू शकले नाही, केरळच्या लेखिकाचे विषारी शब्द

राजधानी दिल्लीमध्ये उष्मघाताने 45 लोकांचा मृत्यू

IIT Bombay मध्ये रामायणाचा अपमान ! 8 विद्यार्थ्यांना 1.2 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला

जळगांव : आरोपीला नागरिकांच्या ताब्यात द्या ही मागणी करीत पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ, अनेक पोलीस कर्मचारी जखमी

पुढील लेख
Show comments