rashifal-2026

तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा लष्कराकडून कासोचा वापर

Webdunia
शुक्रवार, 12 मे 2017 (14:28 IST)

भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दहशतवाद्यांविरोधात ‘घेराव घालणे आणि शोध मोहीम’ (कासो ऑपरेशन) तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  कासोचा वापर काश्मीरमधील दहशतवाद प्रभावित कुलगाम, पुलवामा, तराल, बडगाम आणि शोपियां येथे मोठ्या प्रमाणात केला जाईल.  स्थानिकांच्या विरोधानंतर कासो ऑपरेशन बंद केले होते. २००१ नंतर गोपनीय माहिती मिळाल्यानंतरच घेराव घालणे आणि शोध मोहीम चालवण्यात आली. अशा अभियानावेळी येणाऱ्या अडचणींमुळे सुरक्षा दल स्थानिक लोकांपासून दुरावले होते, असे सुरक्षा दलांना वाटते. नुकताच काश्मीरमधील युवा सैन्य अधिकारी लेफ्टनंट उमर फयाज यांची शोपियांमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यामुळे लष्कराने कासो ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments